भडगाव महाविद्यालयातील प्रा.एस.आर.पाटील व प्रा.सुरेश कोळीचा कर्तव्य पुर्ती सोहळा संपन्न

 भडगाव महाविद्यालयातील प्रा.एस.आर.पाटील व प्रा.सुरेश कोळीचा कर्तव्य पुर्ती सोहळा संपन्न 

भडगाव,दि.२७(प्रतिनिधी )- येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलीत सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्याल यात कर्तव्यपुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा पीटीसी संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप वाघ हे होते व्यासपीठावर व्हाईस चेअरमन तथा विद्यापीठाचे सिनेट सदस्य नानासाहेब व्हि.टी.जोशी कबचौउमविद्यापीठाचे व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र नन्नवरे वअमोल पाटील संस्थेचे संचालक  अण्णासाहेब नानासाहेब देशमुख, संचालक आबा साहेब दत्तात्रय पवार,नगरसेविका सौ.सुचिता वाघ,तनिष्का अध्यक्षा सौं ज्योती संजय वाघ, प्राचार्य डॉ एन एन गायकवाड, उपप्राचार्य डॉ. डी.एम. मराठे, माजी प्राचार्य आर.एल. माळी, पाचोरा एम.एम कॉलेजचे उपप्राचार्य डॉ वासुदेव वले,कला वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा डॉ संजय भैसे,माजी प्राचार्य बी.एन. पाटील, योजना पाटील, सुनील निंबराज पाटील, सत्कारार्थी प्रा.एस.आर पाटील व सौ.रेखा पाटील प्रा.सुरेश कोळी सौ.सरला कोळी होते 

यावेळी प्रा जी.एस.अहीरराव, राजेंद्र नन्नवरे, शिवाजी पाटील, सुनील पाटील,सागर पाटील,कविता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले भाऊसो दिलीप वाघ यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी जडणघडण मध्ये गुरूचे योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या सत्कारार्थी प्रा.एस. आर.पाटील व सुरेश कोळी यांनी संस्थेच्या सहकार्य व महाविद्यालयाचे ॠण व्यक्त करून आगामी काळातही सहकार्यची भावना व्यक्त केल्या 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एम. झाल्टे यांनी सुत्रसंचालन प्रा.डी.ए. मस्की तर आभारप्रदर्शन प्रा शिवाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ .ए.एन.भंगाळे,प्रा. डॉ एस जी शेलार प्रा अर्चना टेमकर,प्रा रचना गजभिये, प्रा ए. एम. देशमुख यांनी प्रयत्न केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू, व गावकरी, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने