बुवापाडा ८ नंबर वार्डात रस्त्यावर खड्डे च खड्डे नागरिकांचे आरोग्य धोक्यात? दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करू : अशोक शहा

 

बुवापाडा ८ नंबर वार्डात रस्त्यावर खड्डे च खड्डे नागरिकांचे आरोग्य धोक्यात? दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करू : अशोक शहा 

अंबरनाथ दि.२८(प्रतिनिधी विशाल शां कुरकुटे ):अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील पश्चिम बुवापाडा  वार्ड 8 मधील सुदर्शन चौक ते तबेला रस्त्याची  दयनीय अवस्था अत्यंत खराब झाली असून डबक्यांची प्रचंड संख्या वाढल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने अपघातांची घटना वाढीस लागल्या आहेत . निगरगट्ट न.पा.प्रशासन मुग गिळून गप्प असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.हा रस्ता त्वरित दुरुस्ती न केल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा लोकाधिकार सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक रामबोध शाह यांनी दिला आहे.

 रस्त्यावरून प्रवास करताना नागरीकांना  जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. जागोजागी रस्त्याला खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने तर या रस्त्याचे तीन तेरा झाले आहेत. हा रस्ता म्हणजे खड्डेमय रस्ता झाला आहे. दुचाकी वाहनाला पडण्याची घसरण्याची भीती तर चार चाकी वाहन चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  परिस्थितीला जबाबदार कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या रस्त्यावरील खड्यात साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रस्त्यावर मोठ-मोठ्याला खड्ड्यामुळे जीवितहानी व गंभीर स्वरूपाचे दुखापत निर्माण होत आहे  नागरिकांना वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे याची दखल न.पा.प्रशासनाने तात्काळ घ्यावी अन्यथा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो असा इशाराही  अशोक  शाह यांनी दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने