शरदचंद्रिका पाटील फार्मसी कॉलेजात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे कॅम्पस मुलाखतीत ४४विद्यार्थी पात्र..

 शरदचंद्रिका  पाटील फार्मसी कॉलेजात  ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे कॅम्पस मुलाखतीत ४४विद्यार्थी पात्र..

♦️झायडस कॅडीला, ब्लू क्रॉस, पिरामल हेल्थकेयर आणि ग्रुप फार्मासुटिकल्स कंपनीने घेतल्या मुलाखती

चोपडा दि.२१(प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण मंडळ  संचलित  श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल तर्फे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन दिनांक 20 जुलै 2024 रोजी यशस्वीरित्या करण्यात आले. सदर कॅम्पस मुलाखती या चार नामांकित कंपन्यांकडून घेण्यात आल्या असून यामध्ये झायडस कॅडीला, ब्लू क्रॉस, पिरामल हेल्थकेयर आणि ग्रुप फार्मासुटिकल्स ह्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एकूण 90 विद्यार्थ्यांनी या मुलाखतीत सहभाग नोंदविला होता व त्यापैकी ४४ विद्यार्थी हे विविध विभागांसाठी पात्र ठरले . त्यापैकी क्वालिटी  कंट्रोल व क्वालिटी अशुरन्स या विभागासाठी २५ विद्यार्थी तर प्रोडक्शन साठी १४ विध्यार्थी व मार्केटिंग साठी ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विध्यार्थ्यांसाठी एवढी मोठी संधी त्यांच्या दारापर्यंत  चालत आल्याने  समाधानाचे वातावरण होते. 

सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॕड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. ताईसाहेब स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे, रजिस्ट्रार श्री. प्रफुल्ल मोरे व सर्व विभाग प्रमुख यांनी कौतुक व अभिनंदन केले. कॅम्पस यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल च्या मुख्य डॉ. रुपाली पाटील व प्रा. नलिनी मोरे, प्रा, आकांक्षा पाटील ,प्रा. श्रेया जैन आणि सर्व शिक्षकेतर बंधूंचे  सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने