शेतकरी बांधवांनो फवारणी करतायं..! वाचा कृषी अधिकारी काय म्हणतायं..!

  शेतकरी बांधवांनो फवारणी करतायं..! वाचा कृषी अधिकारी काय म्हणतायं..!      

  जळगाव, दि. ९ (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हयाचे कापूस हे  मुख्य पिक असून त्यासोबत मका  व सोयाबिन पिकाच्या लागवडीत वाढ झालेली आहे. खरीप हंगाम -२०२४  मध्ये आतापर्यंत मुबलक प्रमाणात  पाऊस झालेला असून सद्या पिकांवर किडरोग न होण्यासाठी शेतकरी बांधवांची आवश्यक  किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे.

             तरी शेतकरी  बांधवांनी किटकनाशकांची फवारणी करीत असतांना खालील दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात  येत आहे.

            किटकनाशकांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिलातच करावी व किटकनाशकांची अंतिम मुदत तपासून घ्यावी,  किटकनाशक फवारणी करतांना नेहमी स्वच्छ कपडे वापरावे, किटकनाशक फवारणी करतांना संरक्षक कपडे वापरा उदा. हातमोजे, चेहऱ्यावर मास्क, गॉगल, टोपी, पुर्ण विजार, अॅप्रन इ. नाक, कान, हात, डोळे यांना किटकनाशकांचा  स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. किटकनाशकाच्या बाटली/ पाकीटावर लिहलेले नर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा, पूड स्वरूपात असणारी किटकनाशके ही अशीच वापरावी ते पाण्यात मिसळू नये, किटकनाशकाचे गरजेपुरतेच द्रवण तयार करावे, लेबलवर दिलेल्या प्रमाणातच किटकनाशके वापर करावा तसेच एकापेक्षा अधिक किटकनाशके एकत्रित मिश्रण करु नये, फवारणीची टाकी भरतांना किटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही याची दक्षता घ्यावी, अति उष्म / अति वेगाने वारा असलेल्या दिवशी फवारणी करू नका, शांत आणि थंड दिवशी फवारणी करा,  वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी न करता वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. फवारणीचे काम पूर्ण होईपर्यत काही  खाऊपिऊ नका, तसेच धुम्रपान किंवा तंबाखू चघळू नका. फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी व साबण वापरुन धुवावीत, फवारणी झाल्यानंतर लगेचच व्यक्तीला / पाळीव प्राण्याला  शेतात जाऊ देऊ नये, प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा, किटकनाशकाचे रिकामे  डबे स्वच्छ मिसळून नंतर त्याची प्रचलित व सुयोग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी, किटकनाशक विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास, विषबाधा झालेल्या  व्यक्तीस तात्काळ रुग्णालयात दाखल करून वापरलेल्या किटकनाशकाची बॉटल / पाकीट सोबत नेण्यात यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने