राष्ट्र विकासात शिक्षकाची भूमिका महत्वाची... संदिप वाकचौरे...

 राष्ट्र विकासात शिक्षकाची भूमिका महत्वाची... संदिप वाकचौरे...

  चोपडा दि.१५(प्रतिनिधी):- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची यशस्वी अंमलबजावणी व नव्या शैक्षणिक धोरणाचे ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्याची दोरी शिक्षकांच्या हाती असून जर शिक्षकांनी मनापासून वर्ग स्तरावर नवे शैक्षणिक धोरण आपल्या व्यवसायावर निष्ठा ठेवून कार्य केले व अध्ययन निष्पत्ती नुसार अध्ययन अनुभव दिले तर संपूर्ण देशात नवे शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविले जाईल व भारतातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही व भारत देश लवकरच विकसित राष्ट्र होईल असा विश्वास संदिप वाक् चौरे ( सदस्य - व्यवस्थापन समिती - नवे शैक्षणिक धोरण ) यांनी व्यक्त केला. ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.

     राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य वैशिष्टये प्रत्येक शिक्षकास माहीत असावीत. बहुपैलूत्व, पूर्वाध्यापन वर्ग, खेळ आधारीत शिक्षण, शिक्षणातून आनंद, अध्ययन निष्पत्ती, अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रीय रचनेत बदल आदी बाबींवर त्यांनी विवेचन केले.

    अजित पाफाळे ( मनशक्ती केन्द्र लोणावळा ) यांनी बौद्धिक, भावनिक, सामजिक व आनंदी विकास कसा साधावा तसेच संतुलित आहार, वाचनाचे महत्व, ध्यानधारणा इत्यादी विषयांवर प्रभावीपणे मार्गदर्शन केले.

    साहित्यातून मूल्यांची रूजवणुक या विषयावर आनंददायी व हसत खेळत प्रा. वा. ना. आंधळे यांनी विवेचन केले.

       सदर दोन दिवसीय कार्यशाळेस संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले,संचालक पंकज बोरोले , उपाध्यक्ष अविनाश राणे व सौ. दिपाली बोरोले पूर्ण वेळ उपस्थित राहिले. सदर कार्यशाळेचा लाभ १५० शिक्षक - शिक्षिकांनी घेतला. सदर कार्यशाळे दरम्यान चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यशाळेची वेळ सकाळी ८ सायंकाळी ५ वाजे पर्यंत होती.

      दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेस अजित पाफाळे ( मनशक्ती केन्द्र - लोणावळा ) , संदीप वाक् चौरे ( सदस्य - संपादन समिती NEP ) ,  उमेश डोंगरे ( माजी उपशिक्षणाधिकारी तसेच SCERT व यशदा विषयतज्ञ ) , परशूराम पावसे ( माजी शिक्षणाधिकारी - पुणे, हिंगोली, नगर ) , मनिष शिंदे ( पिंपरी - चिंचवड, पुणे ) , प्रा. वा. ना. आंधळे ( कवी व साहित्यिक - एरंडोल ) आदि वक्ते उपस्थित होते.

   सदर दोन दिवसीय कार्यशाळेस डॉ.  सुरेश पंडीत बोरोले ( अध्यक्ष - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ) ,  पंकज बोरोले ( संचालक - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था  ) , अविनाश राणे ( उपाध्यक्ष - पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ) , सौ. दिपाली बोरोले , एम. व्ही. पाटील ( मुख्याध्यापक - प्राथमिक विभाग ) , व्ही. आर. पाटील ( मुख्याध्यापक - माध्य. व उच्च माध्यमिक विभाग ) , प्रो. आर. आर. अत्तरदे ( प्राचार्य - पंकज कला व विज्ञान महाविद्यालय ) , मिलिंद पाटील ( प्राचार्य - पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल ) , केतन माळी ( प्राचार्य - पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल ) , सौ. रेखा पाटील ( पंकज बालसंस्कार केंद्र )  तसेच सर्व विभागातील शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने