महिला मंडळ शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; स्वागत वातावरणात विद्यार्थी जाम खुश

 महिला मंडळ शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; स्वागत वातावरणात विद्यार्थी जाम खुश 

चोपडा दि.१५(प्रतिनिधी)- येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात करण्यात आली. आकर्षक असे प्रवेशद्वार, शालेय परिसराची सजावट, ढोल ताशांचा गजर, प्रवेशद्वारावर होणारे औक्षण आणि फुलांसह होणारे स्वागत, मिळालेली नवी कोरी पुस्तके आणि खाऊ यामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थी भारावले व शाळेच्या वातावरणात रंगल्याचे चित्र शाळेच्या पहिल्याच दिवशी दिसून आले.

           शाळा प्रवेशोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनम गुजराथी होत्या. यावेळी उपाध्यक्ष सौ. छाया गुजराथी, संचालिका सौ. संध्या शहा, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. आशिष गुजराथी यांच्यासह मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील हे मंचावर उपस्थित होते.


  यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्येची देवता मां सरस्वती, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले व भगिनी मंडळ संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. डॉ. सुशीलाबेन शाह यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करुन शाळेत प्रवेश केला. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले. शिक्षिका कविता पाटील, यशोदा ठोके, शीतल माळी यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. शिक्षक संजय सोनवणे, भावेश लोहार, वनराज महाले, प्रशांत चव्हाण, विजय पाटील यांनी प्रवेशद्वाराची व परिसराची आकर्षक सजावट केली होती. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटपाचे नियोजन शिक्षक चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन, सागर चौधरी यांनी केले व ग्रंथपाल राजेश गुजराथी, मदतनीस संजय पाटील, मच्छिंद्र साळवे यांच्या मदतीने वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना लिपिक भूषण धर्माधिकारी, गोपीचंद पाटील यांच्यासह धनराज मिस्त्री, बाळासाहेब भालेराव, राधेश्याम पाटील, तुषार भाट, राहुल मिस्त्री यांच्या मदतीने मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने