भडगाव महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा डॉ डि एम मराठेंची नियुक्ती

 भडगाव महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा. डॉ .डि एम .मराठेंची नियुक्ती

 भडगाव,दि.१५(प्रतिनिधी) - येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नुकतीच सेवा जेष्ठते नुसार प्रा डाॅ डि. एम. मराठे यांची पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने उपप्राचार्य पदी नियुक्ती केली आहे. आज रोजी आपल्या संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ यांचे हस्ते आदेशपत्र देण्यात आले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट सदस्य नानासाहेब व्ही टी जोशी, संचालक अण्णा साहेब देशमुख, अप्पासाहेब सतीश चौधरी,, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन एन गायकवाड, माजी उपप्राचार्य प्रा एस आर पाटील, महाविद्यालयाचे कला आणि वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रोफेसर डॉ एस डी भैसे , जेष्ठ प्रा सुरेश कोळी, प्रा सुनील शेलार,प्रा गजानन चौधरी आदी उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही मराठे सराचे अभिनंदन केले.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने