शाळेचा पहिल्या दिवशी धुमधडाका..!अडावदला घोड्यावर बसवून विद्यार्थ्यांची मिरवणूक

 शाळेचा पहिल्या दिवशी धुमधडाका..!अडावदला घोड्यावर बसवून विद्यार्थ्यांची मिरवणूक 

चोपडा दि.१६(प्रतिनिधी ) तालुक्यातील अडावद  येथील शामराव येसो महाजन विद्यालय व आदर्श प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जनजागृतीसाठी घोड्यावर बसवून विद्यार्थ्यांची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली. तसेच मिष्टान्न भोजन देण्यात आले. यामुळे विद्यार्थी व पालकवर्ग आनंदीत दिसला. 

      १५ रोजी सकाळी ८ वाजता येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित खाजगी आदर्श प्राथमिक शाळा व शामराव येसो महाजन विद्यालयात शाळा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आदर्श प्राथमिक शाळेत घोड्यावर दोन विद्यार्थिनींना बसवून वाजत-गाजत काढण्यात आली. मागे इतर विद्यार्थी विविध घोषणा देत होते. सदर मिरवणूक दुर्गादेवी चौक, मधला माळी वाडा, संत सावता महाराज मंदिर, सुभाष चौक, वरचा माळी वाडा, श्रीराम मंदिर चौक, महात्मा फुले रस्ता, संत रोहिदास नगर, पारधी वाडा, महादेव मंदिर, नेवे नगर, लोखंडे नगर, पांडुरंग नगर, चामुंडा नगर, के.टी. नगर, वनादाजी नगर अशी काढण्यात आली. शाळेत प्रवेश करतांना सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. प्रत्येक वर्गात व शालेय आवारात आकर्षक पताका व फुग्यांची मांडणी करून सजविण्यात आली होती. 

   सर्व १ ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके देण्यात आली. मध्यान्ह भोजनात जिलेबी या मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित पालकांनाही गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 

     सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, एस. टी. महाजन, आर. जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी, वर्षा महाजन तर शा.ये.महाजन विद्यालयाचे   मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, एन. ए. महाजन, व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम.एन. माळी, पि. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पि.एस. पवार शिक्षकेतर कर्मचारी लिपिक सी.एस.महाजन, शिपाई ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने