भरत शिरसाठ यांना राजर्षी छत्रपती शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर

 भरत शिरसाठ यांना राजर्षी छत्रपती शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर

    चोपडा दि. २७ (प्रतिनिधी)तालुक्यातील विरवाडे  येथील जि.प. शिक्षक प्राथ. शाळेचे मुख्याधापक भरत भिमराव शिरसाठ यांना अविष्कार सोशल अण्ड एज्युकेशनल फाउंडेशनकोल्हापूर यांच्या वतीने देण्यांत येणारा या वर्षाचा लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार- २०२४ भरत भिमराव शिरसाठ यांना जाहिर झाला आहे.

      अविष्कार फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षीसामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव राजर्षी शाहू महाराजांच्या २६ जून जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय व राज्यस्तरपुरस्काराच्या रूपाने सन्मानित करण्यांत येते,भरत शिरसाठ सर हे गेल्या पंधरा वर्षा पासून सामाजिक व

शैक्षणिक क्षेत्रात कार्य करित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक कार्यक्रम व शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडले आहेत.त्यांचा या कामगिरीचा गौरव योग्य पुरस्काराने होणार आहे.  या निवडीचे पत्र अविष्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी दिले आहे.

          सदर पुरस्कार दि. ३० जून २०२४ रोजी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे  विशेष अतिथी मा. नगीनभाई प्रजापती निवृत्त अभियंता इसरो (इंडिया) व कोल्हापूरचे खासदार शाहू राजे यांच्या हस्ते प्रदान होणार आहे.आज पावेतो भरत शिरसाठ सरांना १५ राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ते भारतीय बौद्ध महासभा या सामाजिक व धार्मिक संस्थेचे चोपड़ा शहर अध्यक्ष आहेत. व शैक्षणिक कर्मचारी कास्ट्राईब संघटनेचे चोपडा तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत.  लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल भरत शिरसाठ यांचे अभिनंदन विविध सामाजिक,शैक्षणिक पदाधिकारीनी केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने