३ तालुक्यातील कोळी समाजाचा त्या विद्यार्थ्यांना जुलैत होणार 'वह्या वाटप'..नाव नोंदवा आवाहन

 ३ तालुक्यातील कोळी समाजाचा त्या विद्यार्थ्यांना जुलैत होणार  'वह्या वाटप'..नाव नोंदवा आवाहन 

चोपडा दि.२४(प्रतिनिधी)*जळगाव जिल्हयातील चोपडा , यावल , जळगाव तालुक्यात शिक्षण घेणारे* कोळी जमातीच्या इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंत  

जि.प.  , नगरपालिका व महानगरपालिकेच्या  मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे वडील वारले असतील व त्यांची विधवा आई त्यांचे संगोपन करत असेल, अशा गरजवंत विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये या भावनेतून  या विद्यार्थ्यांना "वह्या  वाटपाचा कार्यक्रम "  राबविण्याचे  टार्गेट मल्टिपर्पज फाउंडेशनने ठरवले आहे.

           तरी वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांनी  आपली नावे खालील नमुन्यात दिनांक -10 जुलै 2024 पर्यंत.  *टार्गेट मल्टिपर्पज फाऊंडेशन कडे - संस्थेचे संस्थापक सचिव - प्रमोद सुभाष चिंचाळे (कोळी)  यांच्या खालील whatsapp 9422357664* क्रमांकावर पाठवावीत.*

   *नमुना खालीलप्रमाणे*

विद्यार्थ्याचे नाव.              इयत्ता.   शाळेचे संपूर्ण नाव.          संपूर्ण पत्ता.          संपर्क क्रमांक

 *WhatsApp - 9422357664*

चौकशीसाठी संपर्क क्र. 8379816051*

शाळेत प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट  यापैकी जे शक्य असेल त्याचा फोटो देखील पाठवावा.असेही आयोजकांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने