चोपड्याचे युवा चित्रकार अनिलराज पाटील यांच्या चित्राची दुबई चित्र प्रदर्शनात निवड


चोपड्याचे  युवा चित्रकार अनिलराज पाटील  यांच्या चित्राची दुबई चित्र प्रदर्शनात निवड

चोपडा दि.२७(प्रतिनिधी) :चोपडा येथील युवा चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील  यांच्या संकटमोचन हनुमान या चित्राची दुबई येथे होत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शन व स्पर्धा पाचव्यांदा निवड करण्यात आली आहे.

 दुबईच्या आर्ट्स अँड क्राफ्ट स्टार ग्लोबल या संस्थेमार्फत संकट मोचन हनुमान भाग दोन सुंदर कांड या विषयावर आधारित देश विदेशातून 275 चित्रे मागवण्यात आली संपूर्ण भारतातून नामवंत चित्रकारांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी अनिलराज यांनी महाबली हनुमान यांनी सूर्यपुत्र शनिदेव यांना लंकेतून मुक्त केले होते व लंका जाळली होती. अनिल राज यांनी आपल्या चित्र माध्यमातून हनुमानाचे  दर्शन दाखवले आहे.

 या कामगिरीबद्दल माजी प्राचार्य राजेंद्र महाजन सर, ललित कला केंद्र चोपडा. प्राचार्य सुनील बारी सर. प्राध्यापकवर्ग, कर्मचारी वर्ग, मित्रपरिवार यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे आयोजक अनिल केजरीवाल सर यांनी अनिलराज पाटील यांना सहभाग पोस्टर पाठवून शुभेच्छा दिल्या.हे प्रदर्शन 2025 हनुमान जयंतीला होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने