चौगाव येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

 चौगाव येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

     चौगाव ता.चोपडा दि.६(प्रतिनिधी)येथे वन विभागाच्या वतीने यावल उपवन संरक्षक जमीर शेख ,सहाय्यक उपवन संरक्षक प्रथमेशजी हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली व वनक्षेत्रपाल बी.के थोरात यांच्या सहकार्याने पाच जून रोजी  जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

  दिवसें दिवस वाढणारे तापमान,पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्यामुळे  मानवी जीवणावर होणारे दुष्परीणाम हा जनतेसाठी नविन विषय राहीलेला नाही.

 पर्यावरण वाचवायचे असेल तर प्रत्येकाने किमान दोन झाडं जगवली पाहीजेत .झाडे जगवण्यासाठी हिच वेळ योग्य आहे.कारण आत्ताच तापमान पंचेचाळीसच्या पुढे गेलं आहे. त्यामुळे उष्माघाताने कित्येक प्राण्यांना व पक्षांना जीव गमवावा लागला आहे.अजून पाच वर्षात ते पन्नासच्या आसपास पोहचेल.तेव्हा मात्र आहेत ती झाडेही जळून जातील,मानवी जीवनावर त्याचा विपरीत परीणाम होईल,पाण्याचे स्त्रोत आटून जातील.अशा परीस्थीतीत नविन झाडे लावणंही शक्य होणार नाही.

 म्हणून येणार्या पावसाळ्यात किमान आपल्या भावी पिढीसाठी तरी व्रुक्ष लागवड व संवर्धन व्हावे असे अवाहन चोपडा वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांनी केले.

  यावेळी चौगाव येथील कक्ष क्र.259 मध्ये नीम या पर्यावरण पुरक झाडांची लावणी चौगाव येथील सरपंच कल्पना गोकूळ पारधी यांच्या हस्ते  करण्यात आली. या प्रसंगी वनपाल जय प्रकाश सुर्यवंशी,चौगाव वन व्यवस्थापण समिती उपाध्यक्ष विश्राम तेले,वनसंरक्षक सरला भोई,अमोल पाटिल,शुभम पाटील,राहुल पाटिल,रावसाहेब कोळी,संजय पाटील,गोकूळ पारधी आदी उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने