जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांवर पुनःश्च भाजपाचे वर्चस्व*.. *रक्षाताई खडसे ह्यांची हॅटट्रिक तर स्मिताताई वाघ ह्यांचाही दणदणीत विजय*

 

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांवर पुनःश्च  भाजपाचे वर्चस्व.. रक्षाताई खडसे ह्यांची हॅटट्रिक तर स्मिताताई वाघ ह्यांचाही दणदणीत विजय

चोपडा दि.४(प्रतिनिधी )रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षाताई खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधत विजय प्राप्त केला आहे. जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षाताई खडसे यांनी लीड घेत विजय मिळविला. शरद पवार गटाचे श्रीराम दादा पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.तर जळगाव मतदार संघातही भाजप उमेदवार स्मिताताई वाघ यांनी करण पवार यांचा पराभव करीत जोरदार बाजी मारत विजयी पताका फडकविली आहे.जिल्ह्यातील दोन्ही जागा राखत भाजपाने पुनःश्च आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
*रक्षाताई खडसे ह्यांचे हॅट्ट्रिक*
रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे., १९ सांव्या फेरीपर्यंत रक्षा खडसे यांना एकूण ५ लाख २४ हजार ४८० मते मिळाली तर श्रीराम पाटील यांना ३ लाख १२ हजार ४१८ मते मिळाली. त्यानुसार रक्षा खडसेंनी तब्बल दोन लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला.

*स्मिताताई वाघ यांचा दणदणीत विजय*
जळगाव लोकसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे जळगावमध्ये भाजपाने पुन्हा गड राखला आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना ४ लाख ८३ हजार ७४८ मतं मिळाली आहेत. तर, महाविकास आघाडीच्या करण पवार यांना २ लाख ९५ हजार ७८२ मतं मिळाली‌. जळगावमध्ये एकूण ११ लाख ६५ हजार ९६८ मतदान झालं होतं. यातील १० लाख २९ हजार ७१७ मतमोजणी झाली आहे. तर, निकाल हाती येईल पर्यंत १ लाख ३६ हजार २५१ इतकी मतमोजणी बाकी  होती  जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मागील २० वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. आता यंदाचं या लोकसभा मतदारसंघातील चित्रही समोर आलं आहे. भाजपने आपला गड राखला आहे.  खासदार उन्मेष पाटील यांचं बंड - जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारलं होतं. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. मात्र, तरीही भाजपचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने