चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा

 चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा 

चोपडा दि.५(प्रतिनिधी ):महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील आणि सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांच्या प्रेरणे महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या आवारातील परिसरात  व बाहेरील परिसरात वृक्षारोपणाच्या आयोजन करण्यात आले.  वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व डॉ.स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षण मंडळाच्या आवारातील परिसरात व बाहेरील परिसरात 50  रोपांची लागवड करण्यात आली. प्राचार्य डॉ.गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाच्या  आयोजन करण्यात आले वृक्षारोपणासाठी फार्मास्युटिक्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी व्ही जैन. फार्माकोग्नोसी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम डी रागिब.क्वालिटी ॲशुरन्स  विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संदीप आर. पवार  तसेच एनएसएस चे प्रा .रोहित पाटील , प्रा.योगेश चौधरी, प्रा .भूषण पाटील , प्रा. कांचन पाटील , प्रा. रवींद्र श्रावणे यांचे सहकार्य लाभले तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक पी. बी. मोरे यांचे सहकार्य लाभले तसेच शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र परदेशी , प्रवीण सोनवणे ,अजय सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने