जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली

 जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली 

चोपडा ( प्रतिनिधी)--आज दि. 5 जून  जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने वनविभागाकडून शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली.

     सविस्तर असे की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरात भव्य सायकल रॅली वनविभागाकडून काढण्यात आली होती यात शहरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता   छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ह्या रॅलीला सुरुवात करण्यात आली समाजात जनजागृती व्हावी व वृक्षतोड प्रत्येकाने थांबवावे यासाठी प्रत्येक सायकलवर विशिष्ट स्लोगन लावण्यात आले होते या स्लोगन द्वारे जनजागृती करून वन विभाग व समाजातील प्रत्येक घटकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणा वर वृक्ष लागवडीचे यावर्षी नियोजन करण्यात येईल तसेच यावर्षी तापमानाचा पारा 47 डिग्री पर्यंत गेल्याने प्रत्येक माणसा च्या मनात आपणही वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे अशी दृढ इच्छा समाजातील प्रत्येक घटकात निर्माण झालेली आहे त्यामुळे आज च्या रॅलीचे नियोजन करण्यासाठी स्वतःहून लोक व अनेक सामाजिक संस्था या रॅलीत सहभाग सहभागी होताना दिसत आहे रॅली मोठ्या प्रमाणात निघाल्याने याच्या फायदा चोपडा शहरवासीयांना नक्कीच होईल असेही  जमीर शेख  उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्र चोपडा (प्रादेशिक) व सामाजिक वनीकरण चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमेश हाडपे सहा.वन संरक्षक (वनी व वन्यजीव ) चोपडा श्री. बी. के. थोरात म.वनक्षेत्रपाल चोपडा (प्रादेशिक)यांच्यासह चोपडा शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण दिवस निमित्ताने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक, वनपाल ,वन मजूर वनसेवक उपस्थित होते. वृक्ष लागवड करून जागतिक वन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच सर्व वनपाल,वनरक्षक,वनमजूर वनसेवक प्रादेशिक व सामाजिक विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वनक्षेत्रपाल बी.के थोरात यांनी सांगितले की 48 हजार वृक्षांची प्लांटेशन झालेले तयार आहेत इतके वृक्ष लागवड तर करायचीच आहे तसेच अजून नवीन वृक्ष लागवड देखील करू असेही थोरात यांनी सांगितले सायकल रॅली चोपडा शहरातून मेन रोड वरून स्वस्तिक टॉकीज च्या रोडावरून वन विभागाच्या कार्यालयात समारोप करण्यात आला रॅली चे नियोजन करण्यासाठी वनपाल वनमजूर वनसेवक यांनी मेहनत घेतली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने