पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात रक्षा ताई खडसेंचा शपथविधी..महिला व बालकल्याण खाते मिळण्याची शक्यता ?

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात रक्षा ताई खडसेंचा शपथविधी..महिला व बालकल्याण खाते मिळण्याची शक्यता ?

नवी दिल्ली दि.९:रावेर लोकसभा मतदार संघात पक्षाशी एकनिष्ठ आणि सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकाविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये रावेरच्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदी संधी मिळाली.रात्री९:३०वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या मंत्री पदाची शपथ राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या समक्ष नुकतीच घेतली.त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा व राजनाथसिंह यांचा आशीर्वाद घेतला.
श्रीमती रक्षा ताई खडसें ह्यांचा कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. सासरे एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही रक्षा खडसे या भाजपबरोबर एकनिष्ठ राहिल्या. त्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे.
संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत
रक्षा खडसे या 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. रक्षा खडसे यांचा जन्म 13 मे 1987 रोजीचा झाला.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह एकनाथ खडसे यांचे पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाला.
2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनीष जैन यांनी निखिल खडसे यांचा पराभव केला. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरु झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच 2013 मध्ये निखिल खडसे यांनी आत्महत्या केली. रक्षा खडसे यांच्यासाठी ही मानसिक आघात करणारी घटना होती. परंतु, यातून त्या सावरल्या. पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक कार्यात झोकून दिले. कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य2014 मध्ये रावेर मतदारसंघातून खासदार, असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. 16 व्या लोकसभेत वयाच्या 27 व्या वर्षी निवडून गेलेल्या रक्षा खडसे या सर्वांत तरुण खासदारांपैकी एक होत्या. 2019 व 2024 लोकसभा निवडणुकीतही पक्षाने पुन्हा रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवला आणि मतदारांनी रक्षा यांच्यावर विश्वास ठेवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने