जिल्हा महिला व बालकल्याण व वर्ल्ड व्हिजन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार थांबविणे अभियानास प्रारंभ

 

जिल्हा महिला व बालकल्याण व वर्ल्ड व्हिजन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार थांबविणे अभियानास प्रारंभ 

धरणगाव दि.१४(प्रतिनिधी):बालकामगार निषेध दिवसाच्या निमित्ते बालकामगार थांबविणे अभियानास सुरवात करण्यात आली स्टॉप चाईल लेबर)वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव ,जन साहस संस्था अमळनेर व जिल्हा महिला व बालकल्याण व बाल स्वरक्षण विभाग जळगांव  यांच्या संयुक्त विद्यमाने  बाल कामगार थांबविणे अभियानास आरंभ दिनांक १३ जून २०२४ रोजी धरणगाव येथे करण्यात आला असून हे अभियान संपूर्ण सप्तहा भर 23 गावात जनजागृती करण्यात येईल  व सोबत सिग्नीचर साक्षरता मोहीम राबविण्यात आली व पूर्णतः मुलांच्या समस्या साठी मत दिले यात सर्व उपस्थित  सदस्य यांनी साक्षरता करून सुरवात केली.

या अभियानास चे सुरवात जळगांव जिल्हा बाल स्वरक्षण विभागचे अधिकारी श्री.पवन पाटील सर व वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी केले व बाल गटाचे पदा अधिकारी यांनि केला त्याच प्रमाणे या वेळेस पोस्टर स्टॅन्डडी व रॅली काडून उदघाटन करण्यात आले व सर्वानी शपथ घेतली व नारे लावले "बंद करा बंद करा बाल मजूरी बंद करा "जिल्हा बाल स्वरक्षण विभागचे अधिकारी पवन पाटील यांनी मार्गदर्शन केले ,या वेळेस  कसे जिल्हा बाल स्वरक्षण विभाग जळगांव मुलानं साठी काम करीत आहेत हे सविस्तर माहिती दिली . तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगावप्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी कसे बाल कामगार थांबऊ शकतो व आपली जबाबदारी कसे पुढे नेऊ शकतो याची सविस्तर मार्ग दर्शन केले , जन साहस संस्था राहुल चौधरी सर यांनी  कसे बाल कामगार व स्तलांतर कसे  थांबऊ शकतो  याची मुलांना माहिती दिली . तसेच धरणगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सातपुते सर  यांनी मुलांना बालकामगार थांबविणे या विषयी मार्गदर्शन केले .  या कार्यक्रमासाठी धरणगाव तालुक्याचे ५० बाल गटा तील मुख्य प्रतिनिधि म्हणुन १२५ मुले उपस्थित होते .  या  वेळेस कृषी बाजार समितीचे उप सभापती संजय पवार धरणगाव, पत्रकार व ग्राम पंचायत सदस्य विनोद पाटील वराड , पोलीस पाटील धरणगाव संघाचे अध्यक्ष किशोर बेदाणे , पोलीस पाटील राजू वाडले  साहेब , जन साहस संस्था अमळनेर चे फिल्ड ऑफिसर सोनम केदार  मॅडम , राहुल चौधरी, श्रीनाथ साळुंके , प्रियांका गायकवाड, वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव कर्मचारी रतिलाल वळवी , अंकिता मेश्राम , विजेश पवार , निखिल कुमार सिंग , स्वयंम सेवक जितेन पाटील , रचना जाधव , वैष्णवी पाटील  व आरती पाटील आधी उपस्तित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने