आदिवासी बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या..! चोपडा तहसीलदारांकडे भाजपाची मागणी

 आदिवासी बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या..! चोपडा तहसीलदारांकडे भाजपाची मागणी 

चोपडा दि.१३(प्रतिनिधी)जामनेर तालुक्यातील चींचखेडा बु. येथील 6 वर्षीय आदिवासी भिल्ल बालिकेवर अत्याचार करून जिवे मारणाऱ्या नराधम सुभाष उमाजी नाईक यास त्वरित अटक करून फास्टट्रक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या अशी मागणीअनु. जमाती भारतीय जनता पक्ष जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष श्री. मगन बाविस्कर  यांनी तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी चोपडा भाजपा चे नेते श्री. प्रदीप पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. धनजय पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री भरत बाविस्कर, लोकसभा विशेष संपर्क प्रमुख श्री रवींद्र मराठे, तालुका सरिटणीस विजय बाविस्कर, शहर सरचिटणीस दिपक बाविस्कर, पंचायत राज जिल्हा सहसंयोजक श्री तुषार पाठक, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री हेमंत जोहरी, तालुका अनु. जमाती तालुका उपाध्यक्ष श्री भाईदास बाविस्कर, अनु. जमाती शहराध्यक्ष श्री  अभिषेक सूर्यवंशी, माजी तालुका सरचिटणीस श्री चंद्रकांत धनगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने