जैन आगमच्या सिद्धांतला आपल्या जीवनाचे सिद्धांत बनवा -- मोटिवेशनल स्पीकर ध्रुव गोखरू

 जैन आगमच्या सिद्धांतला आपल्या जीवनाचे सिद्धांत बनवा -- मोटिवेशनल स्पीकर ध्रुव गोखरू 

चोपडा येथे "जैनिज्म इन एक्शन" लाइफ डिजाइनिंग कार्यशाला संपन्न


चोपडादि.१५ (प्रतिनिधी)-- मोबाईल,टीव्ही,पाश्चिमात्य जेवण, मुळे पश्चिम संस्कृतीचे अनुकरण आपण जास्त केल्याने आपली बुद्धि नष्ट होत चालली त्यामुळे आपली बुद्धि नको त्या कामात चालते आणि त्यामुळेच जैन सिद्धांतचा अवलंबन करत नाही जर जैन सिद्धांतचा अवलंबन केला तर आपले जिवन सार्थक होऊ शकते.असे स्पष्ट मत सुधर्मा आराधना भवन, गांधी चौक दि.१५ रोजी सकाळी येथे घेतलेल्या "जैनिज्म इन एक्शन" लाइफ डिजाइनिंग कार्यशाळेत राजस्थानचे प्रख्यात लेखक,और मोटिवेशनल स्पीकर युवा ध्रुव गोखरू यांनी आपले मत व्यक्त केले.

                   जैन आगमात "आहार मिच्छे मियमेसणिज्ज"असे म्हटले आहे याचा अर्थ असा की, "थोडे खा,चांगले खा" असा होतो.त्यासोबत मोबाईलचे स्टेटस,रील, अश्लील फोटो,क्राईम स्टोरी, क्राईम सिरीज बॉलिवूडचे विविध अश्लिल सिन हे बंद करून जैन आगमाचे सिद्धांतचे अनुकरण करा तसेच "मंदा य फासा बहुलोहणिज्जा" याचा अर्थ "जो लुभाएगा, वो डूबायेगा" आपले जेवणं हे सात्विक असावे,आणि जेवण करताना जमिनीवरच बसून जेवावे,हॉटेलचे ,पाश्चात्य जेवण टाळावे जैन आगाम मध्ये जो आमिष देतो तोच फसवित असतो. तसेच "स पुव्वमेवं ण लभेज्ज" याचा अर्थ असा की, "अगोदरचे फळ नंतर नही मिळते" ब्रह्म वेळेवर उठावे,राग सोडून भविष्यातील नातेसंबंध चांगले बनवा,धर्माचा कामात अग्रेसर रहा, दान,धर्माच्या कार्यात लहान वया पासूनच सुरवात करा सकाळचे २ तास भगंवताला दया. असे जीवन कसे जगायचे याचे संपूर्ण सिद्धांत जैन आगम मध्ये दिले आहे. जैन आगम प्रमाणे आपण जिवन जगण्याचे सिद्धांत जो मनुष्य आपल्या जीवनात अंगिकार करेल तो नक्कीच  आदर्शवान व्यक्ती होऊ शकतो असे स्पष्ट मत 

राजस्थानचे प्रख्यात लेखक,और मोटिवेशनल स्पीकर युवा ध्रुव गोखरू यांनी कार्यशाळेत सांगितले. यावेळी संघपती प्रदीप बरडीया, विनोद टाटीया,श्रीचंद टाटीया,प्रविण टाटीया, मनिष चोपडा, सौ.प्रभावती राखेचा, सौ.ज्योती टाटीया, श्रीमती कांचनबाई बरडीया, श्रीमती मिना बरडीया, सौ.शकुंतला बरडीया, सौ.प्रभाबाई टाटीया,सौ योगिता चोपडा, सौ.अनिता सुराणा आदी सह भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर,उपाध्यक्ष मयंक बरडीया  तर महिला अध्यक्षा सौ मानसी राखेचा,आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खिवसरा तर आभार प्रदर्शन आदेश बरडीया यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने