प्रताप विद्या मंदिराची उत्तुंग व उज्वल यशाची परंपरा कायम ..दिव्या पाटील प्रथम

 प्रताप विद्या मंदिराची उत्तुंग व उज्वल यशाची परंपरा कायम ..दिव्या पाटील प्रथम 


चोपडा दि.२७( प्रतिनिधी) चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराची विद्यार्थिनी दिव्या गजानन पाटील  हीने 97.40% गुण मिळवून  प्रथम येत  कॉपीमुक्त वातावरणात शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा निकाल 97.61% लागला असून उर्दू विभागाचा 98.11% लागलेला आहे. टेक्निकल विभागाचा 100% निकाल लागला आहे

  एस एस सी मार्च 2024 परीक्षेला एकूण 378 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये 90 % पेक्षा जास्त गुण मिळणारे 35 विद्यार्थी तर विशेष प्राविण्यसह 176 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 123  विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

विद्यालयातून प्रथम पाटील दिव्या गजानन 97.40%, द्वितीय  पाटील प्रथम गुरुदास 96.60%,  तृतीय  तेली रेहान हारुण 95.80% चतुर्थ  पाटील जीवन खुशाल 95.60% तसेच पाचवा क्रमांक आके पुष्कर नरेंद्र 95.20% गुण मिळवून प्राप्त झाला आहे. उर्दू विभागातून इनाया इफरा इद्रिस हुसैन अन्सारी हिने 87.00% गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

        सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा शैलाबेन मयूर, चेअरमन राजाभाई मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल , सचिव माधुरीताई मयूर, संस्था संचालक उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशकाका जैन, सर्व सभासद,संस्थेचे समन्वयक गोविंदभाई गुजराथी, प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक पी डी पाटील  , उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील,  पर्यवेक्षक ए एन भट तसेच  सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू आदींनी यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने