महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात मोहित माळी प्रथम

 महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात मोहित माळी प्रथम 

चोपडादि.२७(प्रतिनिधी) - येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात शाळेने यशाची परंपरा कायम राखत उत्तुंग यश मिळवले. विद्यालयाचा एकूण निकाल ९६.३६ टक्के लागला असून सेमी इंग्रजी विभागाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे तर १२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.

       विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मोहित किरण माळी (९४.२० टक्के) या विद्यार्थ्याने मिळवला असून श्रुती रुपेश रामटेके (९३.६० टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर तृतीय क्रमांकावर स्वाती भागवत माळी व योगेश गोकुळ चित्ते (९२.८० टक्के) यांनी संयुक्तपणे यश मिळवले आहे.

          यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष सौ. पूनम गुजराथी, उपाध्यक्ष सौ. छाया गुजराथी, सचिव  सौ. अश्विनी गुजराथी यांच्यासह महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.आशिष गुजराथी यांनी तसेच मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर वृंदातर्फे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने