हातेड केंद्रात पीटीएस.विद्यालयाचा झेंडा..कु.लिना बोरसे सर्वप्रथम

 

हातेड केंद्रात पीटीएस.विद्यालयाचा झेंडा..कु.लिना बोरसे सर्वप्रथम

चोपडा दि.२७(प्रतिनिधी) तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथील पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाने एसएससी मार्च २०२४ परिक्षेत हातेड सेंटर येथून प्रथम क्रमांकाने येण्याचा  बहुमान पटकावत या वर्षीही आपले स्थान कायम ठेवले आहे.कु. लीना जयवंतराव बोरसे हिने शेकडा ९०.८०% गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे.तर द्वितीय क्रमांक कु. नेहा युवराज शिरसाट (८४.२०% ) आणि तृतीय क्रमांकावर कु. वेदिका धनंजय साळुंखे हिने ८४.००% गुण मिळवून बाजी मारली आहे.

या परिक्षेत सोळा विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे तर नऊ विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत .दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले असून विद्यालयातूनच प्रथम व्दितीयआणि तृतीय क्रमांक साठी मुलींनी बाजी मारलेली आहे  गुणवंत विद्यार्थ्यांचे  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .  बळवंत भिकनराव सोनवणे ,वर्गशिक्षक श्री भुपेश धनगर सर सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेत्तर बंधु भगिनी यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच
अनवर्दे बुधगाव गावातील   पालक  संस्थेचे चेअरमन  प्रवीण सुभाषराव साळुंखे, व्हाय. चेअरमन  ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे, सचिव  हंसराज दगाजी बोरसे तसेच सर्व संचालक स्कूल कमिटीतील सर्व संचालक यांनी गुणवंत  विद्यार्थ्यांचे अभिनंदन   केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने