विकास विद्यालयाचा 97.50%निकाल तन्वी पाटील विद्यालयातून पहिली

 विकास विद्यालयाचा 97.50%निकाल तन्वी पाटील विद्यालयातून पहिली


गणपूर (ता चोपडा)ता 27 : येथील विकास माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97. 50%  लागला असून विद्यालयातून तन्वी नरेश पाटील 87.60%गुण मिळवून पहिली आली. 

विद्यालयातून  सृष्टी ज्ञानेश्वर पाटील 87.20% मिळवून दुसरी,चेतना राकेश पाटील  86.80% तिसरी, प्राजक्ता नरेंद्र देवरे 85.80%गुण मिळवून चौथी,तर माधुरी संजय जोशी 84% गुण मिळवून पाचवी आली. विशेष म्हणजे विद्यालयातून प्रथम पाच आलेले विद्यार्थी मुलीच आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  संजयराव गरुड, उपाध्यक्ष श्री शेळके ,सचिव, सागरमल जैन, यु .यु .पाटील,  दीपकराव गरुड ,संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक  व्ही.आर पाटील, पर्यवेक्षक डी.पी. पाटील, वर्गशिक्षक  ए बी सूर्यवंशी व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.........

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने