पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा दिवस साजरा

 पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा दिवस  साजरा

            चोपडा दि.१(प्रतिनिधी)  पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक २७ फेब्रुवारी  रोजी  मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात  कवी कुसुमाग्रज याच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली . संगीत शिक्षक रविंद्र राजपूत सरांनी माझी भाषा माझी आई कविता गायन सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती विजया पाटील मॅडम यांनी भूषविले.त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना नुतन चौधरी हिने मांडली  सदर कार्यक्रमात शिक्षक मनोगतात विद्यालयाचे  शिक्षक श्री बी एम तायडे सर यांनी मराठी भाषेचे महत्त्व व मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे असेही मनोगतातून सांगितले. विद्यार्थी मनोगत गायत्री पाटील व धनश्री पाटील हिने आपले विचार  मांडले . 

या कार्यक्रमात कवी कुसुमाग्रज व मराठीतील प्रसिद्ध कवींच्या कविता वाचन  सुमित पाटील,दिपीका पाटील, चेतन पाटील विदिशा साळुंखे, निपुण पाटील यांनी केले. भाषा दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, भितीपत्रक स्पर्धा, कविता गायन स्पर्धा  राबविण्यात आली. सदर कार्यक्रमातील सूत्रसंचालन कु.भाग्यश्री पाटील हिने  केले व कार्यक्रमाचे  आभार  कु .पूजा पाटील हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  श्रीमती पोर्णिमा भादले  मॅडम, श्री.बी एम तायडे सर व श्री. विनोद जाधव सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने