राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुणांचा पक्षप्रवेश

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तरुणांचा पक्षप्रवेश



चोपडादि.१(प्रतिनिधी):-आजच्या तरुणांना राजकारणात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कामाची भुरळ पडली असून तरुणांनी देशा चा गावाचा,विकास करण्यासाठी राजकारणात यावे या हेतूने चोपडा येथील सामाजीक न्याय विभागात तरुणांनी मोठया संख्येने पक्ष प्रवेश केला आहे.

          मनोज शिरसाठ मित्र मंडळाच्या वतीने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी कार्यालयात तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील सामाजीक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष मच्चीन्द्र साळुंखे सर,शहर अध्यक्ष गिरीश देशमुख, सामाजीक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे,विनोद पाटील सूतगिरणी संचालक,अर्जुन सीताराम पाचवणे माजी विस्तार अधिकारी कृषी,सनी सचदेव उपजिल्हाअध्यक्ष,सुरेश साळुंखे सरचिटणीस, उपाध्यक्ष गोपाल दाभाडे,युवा शहर अध्यक्ष शुभम सोनवणे,यांच्या हस्ते मोठय प्रमाणात तरुणांनी पक्ष प्रवेश केला.

मनोज नाना शिरसाठ,योगराज माधव वाडे,गीतेश प्रमोद धनगर,भैय्या ताराचंद वाडे,रोहन विनोद वाडे,गणेश अनिल मराठे,रोहित योगराज वाडे,नाना नागो शिरसाठ, प्रेम बाळू साळुंखे,अमोल प्रकाश महाजन,महेश गजानन लोहार, रमेश सुखदेव महाजन,राहुल सुरेश साळुंखे, या तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

त्यांच्या नियुक्ती बद्दल जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल जेडीसीसी संचालक, नारायण पाटील माजी सभापती कृ,ऊ,बा,सोनालीताई पाटील जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा मतदारसंघ व जिल्हाध्यक्ष रवि सपकाळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने