आमदार सौ लताताई सोनवणे यांनी चोपडा व यावल तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची शेत शिवारात केली पाहणी .. तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश

 आमदार सौ लताताई सोनवणे यांनी चोपडा व यावल तालुक्यातील  नुकसानग्रस्त पिकांची शेत शिवारात केली पाहणी .. तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश



यावल/चोपडा,दि.२(प्रतिनिधी) चोपडा व यावल तालुक्यात  काल दि. १/०३/२०२४ रोजी अचानक झालेल्या वादळी पावसाचा फटका सर्वत्र बसला असून आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे  यांनी ताबडतोब महसूल  प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना व कृषी विभागाच्या  कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त  भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल.  

    काल रात्री  यावल व चोपडा तालुक्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने उद्भवलेल्या बिकट  परिस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना धीर देण्यासाठीआमदार सौ.लताताई  सोनवणे यांनी  आज सकाळीच यावल तालुक्यातील किनगाव, आडगाव,चिंचोली,व चोपडा  तालुक्यातील बिडगाव ,मोहरद भागातील शेत शिवारात पोहचून  नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यांच्यासोबत यावल तहसीलदार मोहन माला नाझरीकर, कृषी मंडळ अधिकारी ,कृषी सहाय्यक, सर्कल ,तलाठी, कोतवाल सर्वच  महसूल विभागाचे संबंधित अधिकारी व  कर्मचारींचा फौज फाटा घटनास्थळी उपस्थित होता. हरभरा, गहू ,मका , दादर या रब्बी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने तात्काळ पंचनामे  करा असे आदेशही  यावेळी आ. सौ लताताई सोनवणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले ‌ 

चोपडा  व यावल तालुक्यात वादळी पावसामुळे  नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भाग पिंजून काढत भेट देत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत यावल  कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बबलू कोळी,संचालक सूर्यभान पाटील, माजी जि. प. सदस्य सुभाष अप्पा सोळुंके, गोकुळ आबा साठे,श्रावण दादा कोळी,पिना कोळी,दिनेश सोळुंके,चंद्रशेखर साळुंखे, भैय्या पाटील,भुषण पाटील,नाना कोळी, रावसाहेब पाटील आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने