डॉ. सी. आर.देवरे यांना भारत सरकारकडून पेटंट प्राप्त

 डॉ. सी. आर.देवरे यांना भारत सरकारकडून  पेटंट प्राप्त


 चोपडा दि.१(प्रतिनिधी)येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे,दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी.आर. देवरे यांना नुकतेच भारत सरकारकडून पेटंट कायद्यांतर्गत पेटंट प्राप्त झाले आहे. त्यांनी  *AI BASED FINANCIAL VOLATILE SHARE MARKET ANALYSIS DEVICE* या डिवाइस चे रजिस्ट्रेशन काही दिवसांपूर्वी पेटंट कायद्याअंतर्गत करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांना भारत सरकारकडून पेटंट कायदा अंतर्गत नुकतेच पेटंट जाहीर झालेले आहे.

 त्यांनी ज्या डिवाइस साठी पेटंट घेतले आहे ते डिवाइस शेअर मार्केट मधील विविध कंपन्यांचे शेअर्स किंवा विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ची परिस्थिती कशी आहे व त्याच्यामध्ये किती प्रमाणात धोके आहेत याचे स्पष्टीकरण व विश्लेषण या डिवाइसच्या मार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब एडवोकेट संदीप पाटील ,सचिव ताईसाहेब डॉ. सौ. स्मिता  संदीप पाटील, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील तसेच सर्व कार्यकारी विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी ,तसेच सर्व उपप्राचार्य व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने