इंग्लिश ऑलिम्पियाड परिक्षेत महाजन क्लासेसची भरारी कायम

 इंग्लिश ऑलिम्पियाड परिक्षेत महाजन  क्लासेसची भरारी कायम 


चोपडा दि.१(प्रतिनिधी ): नुकत्याच लागलेल्या इंग्लिश ओलंपियाड परीक्षेच्या निकालात चोपडा येथील महाजन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे जवळपास दहाबारा विद्यार्थ्यांनी विविध  मेडल प्राप्त केले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही इंग्लिश ओलंपियाड परीक्षेत महाजन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी कायम राखली आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी कु. मनाली प्रवीण पाटील हिने ग्रेट ग्रँड गोल्ड पदक मिळवून जोरदार चुणूक दाखविली आहे.


यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे  मनाली प्रवीण पाटील (गोल्ड), आयान लुकमान तडवी (सिल्वर), रेहान मुनीर तडवी, (ब्रान्झ), उन्मेष संदीप पाटील (गोल्ड), अर्चना दीपक पाटील( सिल्वर), आयर्न दीपक पाटील ( सिल्वर),निसर्ग योगेश सोनवणे (सिल्वर), रोहन दिनेश चौधरी (गोल्ड), सचिन दिवाकर बडगुजर (सिल्वर )तेजस रमेश चौधरी (सिल्वर ),चेतन तुकाराम पाटील (गोल्ड) ,रोहित रवींद्र महाजन (गोल्ड), विवेक सानप (ब्रान्झ ),हे विद्यार्थी इयत्ता पाचवी सहावी, सातवी व नववीचे नवे वर्गात तून ओलंपियाड परीक्षेत बसले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासेसचे संचालक दीपक महाजन व पालकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने