विद्यार्थिनींना सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन : स्वाती पाटील

 विद्यार्थिनींना  सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन : स्वाती पाटील


मुक्ताईनगर,दि.९( प्रतिनिधी सतीश गायकवाड)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि सद्गुरु शिक्षण शास्त्र  महाविद्यालय जळगाव विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान सहा दिवसीय कार्यशाळा दिनांक 05 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. आत्मनिर्भर युवती अभियानास प्रोत्साहन देणारे आमचे प्रेरणा स्रोत  महाविद्यालयाचे संचालक डॉ नारायण खडके आणि  वर्षा खडके यांच्या   मार्गदर्शनातून आत्मनिर्भर युवती अभियानाची  अंमलबजावणी यशस्वीरित्या  सुरू आहे.आज कार्यशाळाच्या  पाचव्या दिवशी दिनांक 09/02/2024 रोजी प्रमुख  वक्त्या श्रीमती स्वाती पाटील महिला हेड कॉन्स्टेबल  जळगाव .विद्यार्थिनींना  सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन केले. कोणत्याही अनोंद लिंक वर क्लिक करू नका . कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका तसेच विद्यार्थिनीच्या शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयातील प्रभारी प्राचार्य डॉ अनिता वानखेडे या होत्या. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा पाटील विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अर्चना येवले यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्नेहल  कासार यांनी मानले. सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील 50 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.अभियानासाठी सतत  प्रेरणा देणारे संस्थेचे संचालक डॉ. नारायण खडके आणि वर्षा खडके, महाविद्यालयातील डॉ अनिता वानखेडे ,डॉ प्रतिभा पाटील, डॉ जयश्री पाटील, प्रा सुवर्णा अहिरे, आणि  शिक्षकेतर कर्मचारी  अरविंद पवार,पंकज वाघ, चंद्रकांत सपकाळे प्रथम आणि द्वितीय वर्ष प्रवेशित विदयार्थी शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने