कवि उमराव भाऊराव बोरसे लिखित' विजयास्मृती' कवितासंग्रहाचे प्रकाशन


कवि उमराव भाऊराव बोरसे लिखित' विजयास्मृती' कवितासंग्रहाचे प्रकाशन

झटपट पोलखोल/चोपडा प्रतिनिधी दि.१०फेब्रुवारी :
मानवी आयुष्यात विसंगती आहे. ताण-तणाव आहे. असे असले, तरी उमराव बोरसे यांची कविता वास्तववादी आहे. वास्तवतेला राष्ट्रभक्तीची जोड देवून वेगळ्या पद्धतीने कवितेची मांडणी केली आहे. त्यांच्या या कवितासंग्रहामुळे वाङ्‌मयाचा परीघ नक्कीच विस्तारेल, असा विश्वास ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केला.

 चोपडा तालुक्यातील अनवर्दे खु.रहिवासी उमराव भाऊराव बोरसे लिखित' विजयास्मृती' या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते साहित्य संमेलनात झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कविता संग्रहात दैनंदिन जीवनावर १००पेक्षा अधिक कवितांचा समावेश आहे.

याप्रसंगी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, माजी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, राजेंद्र पाटील,गुलाबराव बोरसे, विश्वास बोरसे,निलेश बोरसे, , आदी मान्यवर होते. सूत्रसंचालन संजय ऐलवाड यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने