विकास विद्यालयात स्काऊट गाईड शिबीर

 विकास विद्यालयात स्काऊट गाईड शिबीर          


      

गणपुर (ता चोपडा)ता 9: येथे विकास माध्यमिक विद्यालयात तीन दिवसीय स्काऊट गाईड   शिबिराचे आयोजन करण्यात आले.             

 मुख्याध्यापक व्ही आर पाटील  यांच्या हस्ते ध्वजारोहणाने शिबिराची सुरवात करण्यात आली. पाचवी ते दहावी च्या वर्गातील मुले आणि मुली या शिबिरात सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी तंबू स्वतः बनवून त्यात वाचनालय,धार्मिक ग्रंथ,शोभेच्या वस्तू,तळ्यातील जीवश्रुष्टी आदी सजावट केली, तसेच दुपारी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. स्काऊट गाईड शिक्षक  ए बी सूर्यवंशी  यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्येक तंबूत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक  व्ही.आर. पाटील ,पर्यवेक्षक डी बी पाटील, सर्व शिक्षक बंधू, भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले........

गणपूर(ता चोपडा) क्रीडांगणावर विविध संघांनी उभारलेल्या राहुट्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने