चोपडा फार्मसी महाविद्यालयात कलातरंग २०२३-२४ चे यशस्वी आयोजन...

 चोपडा फार्मसी महाविद्यालयात कलातरंग २०२३-२४ चे यशस्वी आयोजन...

चोपडादि.१९(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात *कलातरंग २०२३-२४* या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

दि १५ ते १७ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसीय कार्यक्रमात दि १५ फेब्रुवारी ला कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन व क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या स्पर्धेचे उदघाटन अँग्लो मुस्तुफा विद्यालयाचे श्री अजहर जरुद्दीन सर यांनी केले.

क्रिकेट मध्ये तृतीय वर्ष विजयी ठरले.सोबत १६ फेब्रुवारी ला पारंपरिक वस्त्र दिवस, बॉलीवूड दिवस, चॉकलेट दिवस व इतर दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. दि १७ फेब्रुवारी २०२४ ला मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या मुख्य कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेच्या सचिव डॉ सौ स्मिताताई संदीप पाटील यांच्या शुभहस्ते झाले. मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे पालक प्रतिनिधी म्हणून श्री लक्ष्मण पाटील व श्री अजित महाजन लाभले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळाला सोबत शेलापघोटे व इतर कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.कार्यक्रमाचा शेवट पारीतोषिक वितरणाने झाला त्यात वर्षभरात महाविद्यालच्या वतीने तसेच महाविद्यालयात विविध स्पेर्धेत नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य  प्रा डॉ गौतम वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबंधक श्री प्रफुल्ल मोरे, विविध विभागप्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भीगिनींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने