आर. सी. पटेल इंजिनीअर महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा

 

आर. सी. पटेल इंजिनीअर महाविद्यालयात शिवजन्मोत्सव साजरा 





शिरपूर दि.१९(प्रतिनिधी)आज शिरपूर शहरातील आर. सी. पटेल इंजिनीअर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिरपूर फर्स्टच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन केली व आरती करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला शिरपूर विधानसभेचे आमदार श्री. काशीराम पावरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. तुषार रंधे, युवा नेतृत्व नगरसेवक श्री. हेमंत पाटील, भाजप शिरपूर तालुकाध्यक्ष श्री. किशोर माळी, शिवसेना उबाठा धुळे उपजिल्हाप्रमुख श्री. भारत राजपूत यांनी भेट दिली.

यावेळी उत्सव समिती अध्यक्ष शिवर्धन शिंदे, यश चित्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने