कन्या विद्यायात शिवजयंती उत्साहात साजरा

 कन्या विद्यायात शिवजयंती उत्साहात साजरा

चोपडा दि.१९(प्रतिनिधी)चोपडा परिसर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक कन्या विद्यालय चोपडा या शाळेत आज शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राथमिक विभागातील विद्यार्थी  विद्यार्थीनी हर्षाली मोतीराडे, प्रांजल पाटील, रिद्धी  सिद्धी पाटील, हर्षल पाटील, दीपक देशमुख ,वैभव पवार  यांनी बाल शिवराय , जिजाऊ,  तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे व  मावळे यांच्या वेशभूषेत सादरीकरण केले.   तसेच इयत्ता दुसरीचा विद्यार्थी अवेश बागवान व चौथीची विद्यार्थिनी गुंजन निलेश पाटील यांनी शिवरायांबद्दल आपली भाषणे दिली. तर हर्षाली मोतीराळे हिने वेशभूषेसह हिरकणी कविता सादर केली. श्री प्रमोद पाटील सर यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्राची माहिती  दिली.

  शिवरायांनी रयतेला सुखी करणे व परकीय शत्रूंचा जुलूम नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आग्र्याहून सुटका व कोंढाणा सर करणे या गोष्टी रोमांचित पद्धतीने  सांगितल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष  माध्यमिक मुख्याध्यापक श्री पी एस पाटील तसेच प्रमुख पाहुणे शाहिद बागवान  होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी तर सूत्रसंचलन सुजाता पाटील व आभार प्रदर्शन प्रभाकर पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्याम पाटील नीता पावरा ,कांता पाटील, आशा बारी तसेच शिक्षकेतर बंधू निवृत्ती पाटील भागवत येसे यांनी परिश्रम घेतले.

       या वेळी आनंदराव पाटील नितीन पाटील सौ विद्या पाटील, अलका पाटील ,सोनाली पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डी एस पाटील, उमेश धनगर, अभिराज  निकम ,गजानन पाटील सचिन पाटील यासह सर्व प्राथमिक व माध्यमिक  विभागाचे शिक्षक - शिक्षकेत्तर वृंद आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने