नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहाराची नासाडी.. उपशहरप्रमुख नेमीचंद येवले यांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

 नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहाराची नासाडी.. उपशहरप्रमुख नेमीचंद येवले यांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार 


जळगाव,दि.१९ (प्रतिनिधी )नशिराबाद शहर हद्दीत  असलेले   न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची प्रचंड नासाडी होत असून शिक्षण विभागाने  तातडीने लक्ष घालून योग्य ती करावी अशी जोरदार मागणी उबाठा शिवसेनेचे उपशहरप्रमुख अॅड.नेमीचंद येवले यांनी एका पत्रकान्वये केली आहे.ही संस्था एका राजकीय पुढाऱ्यांची वरद हस्त असलेली असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप जनतेने केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

         निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना भोजन दिले जात असते. सदर योजनेचा लाभ सर्व घटकातील मुलांना शासन स्तरावरून शाळे मार्फत अन्न शिजवून प्रमाणात दिला जाऊन प्रमाणातच शिजवला जातो. मात्र नमूद शाळेचे प्रशासनाच्या ढिलाईमुळे  मोफत दिल्या जाणाऱ्या अन्नाची किंमत दिसत नाही. दररोज शिजविल्या जाणाऱ्या अन्नातून  बरेचसे अन्न  हे प्रति दिवस फेकण्यात येत आहे.परिणामी परिसरात पडून असलेले अशा अन्नामुळे  दुर्गंधी पसरत आहे. सदर बाबतीत नागरिकांनी शाळेतील कार्यरत कर्मचारींना विचारले असता पडू द्या उचलतील उचलणारे बोलून निघून जातात. हा उन्मत्तपणा एका राजकीय पुढाऱ्यांच्या वरद हस्तांने  होतों असे  प्रथमदर्शनी दिसून येतेय असे नागरिकांचे म्हणणे आहे. ह्या गंभीर प्रकार विरोधात कोणी आवाज उठवायला  हिंम्मत करीत नाही, कोण शासनाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालेल   असा प्रकार सुरू आहे तरी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी  उ भाटा चे उप शहर प्रमुख ॲड.नेमचंद येवले यांनी केली आहे.

          

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने