चोपडा आगारा तर्फे प्रवासी दिन साजरा.. विनाअपघात सेवा देणारे चालक ,वाहक, यांत्रिकांचा सत्कार

 चोपडा आगारा तर्फे प्रवासी दिन साजरा.. विनाअपघात सेवा देणारे चालक ,वाहक, यांत्रिकांचा सत्कार

=========================

चोपडादि.१७(प्रतिनिधी) येथे दिनांक 16/02/2024 रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा तालुका शाखेकडुन चोपडा आगाराच्या सहकार्याने प्रवासी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा सचिव व अशासकीय सदस्य श्री. उदयकुमार अग्निहोत्री सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच चोपडा पोस्ट ऑफिस चे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. चोपडा आगाराचे सर, श्री. चावरा , यांनी प्रवासी दिन का साजरा केला जातो या बाबत उपस्थित कर्मचारी व प्रवासी बांधवांना आणि विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती दिली. 

यावेळेस चोपडा आगारातील विना अपघात सेवा देणारे चालक, वाहक, यांत्रिकांचा सत्कार करण्यात आला. 

विनाअपघात चालक:- डि. एस. फुलपगारे, एस. बी. देवराज. 

उत्कृष्ट कामगिरी वाहक:- आर. एस. साळुंखे, वाय. वाय. सैय्यद, एन. सी.निकम, 

जास्त उत्पन्न आणणारे वाहक:- आर. यु.जंजाळे, जे.आर.कोळी, व्हि. जी. बागुल, एस. यु.सैंदाणें. 

उत्कृष्ट कामगिरी यांत्रिक कर्मचारी:- के.आर.बोरसे, एस.एम.पाटील, पी.व्हि. साळुंखे, वाय. व्हि. नाथबुवा, एस.व्हि. कोळी. या चारही विभागातील उपस्थित कर्मचारी यांचा सत्कार  ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा तालुका शाखेकडुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

तसेच चोपडा आगाराला स्वच्छेतेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांकने निवड झाल्याने आगारप्रमुख श्री. महेंद्र पाटील साहेब व टीमचाही  ग्राहक पंचायत महाराष्ट्र चोपडा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याच वेळी इंडियन पोस्ट खात्याच्या वेग वेगवेगळ्या विमा योजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित प्रवासी ग्राहकांचे हि आगारप्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व ग्राहकाच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्यात या प्रसंगी जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री सरांनी प्रवासी दिनाचे  लाख मोलाचे मार्गदर्शन केले, त्या नंतर चोपडा आगार प्रमुख:- श्री. महेंद्र पाटील साहेब यांचे देखील मागॅदशॅन लाभले .या प्रसंगी उपस्थित पाहुणे ग्राहक पंचायतयतीचे प्रसिद्धी प्रमुख डाॅ. पृथ्वीराज सैंदाणें ,राजेशभाई गुजराथी, राजेश खैरनार हे उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री. चावरा  यांनी केले. 


         

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने