शासन प्रशासन आदिवासी कोळी जमातीबाबत संवेदनशील नाही...जगन्नाथ बाविस्कर

 शासन प्रशासन आदिवासी कोळी जमातीबाबत संवेदनशील नाही...जगन्नाथ बाविस्कर 


चोपडा,दि.६ (प्रतिनिधी):-आदिवासी कोळी जमातीला संविधानिक न्याय हक्क व अधिकार मिळावेत, यासाठी दि. २३ जानेवारी पासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन उपोषण सुरू आहे. १६ दिवस झालेत तरीही लोकप्रतिनिधी व अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. सर्वच राजकीय पक्ष आदिवासी कोळी जमातीच्या विरोधात आहेत. कोळी जमातीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असतांना त्यांनीही आपल्या आंदोलन उपोषणाबाबत आमदार खासदार मंत्र्यांकडे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणुनच येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी कोळी जमातीला ह्या सर्वांचा विचार करावाच लागेल. कारण आता नाक दाबले तरच तोंड उघडेल म्हणून ह्या राज्यव्यापी महाआंदोलनाद्वारे शेवटचा इशारा देण्याची वेळ आलेली आहे. आजतागायत आमच्या प्रश्नांची दखल न घेणारे सर्वच राजकीय पक्ष, शासन प्रशासनातील लोकप्रतिनिधी व अधिकारी हे आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या संविधानिक अधिकार, न्याय व हक्कांबाबत संवेदनशील नाही, अशी स्पष्टोक्ती राज्यस्तरीय महाआंदोलनाचे अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर चोपडा यांनी ह्या पत्रकांन्वये केलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने