कर्जाने येथे रा. से. यो. विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

 कर्जाने येथे रा. से. यो. विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

चोपडादि.६(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा तर्फे  "सक्षम युवा समर्थ भारत" या थीमवर आयोजित रा. से. यो. सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी समारोप समारंभ पार पाडण्यात आला.  

      या शिबिराच्या नियोजनासाठी व कृती कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

     याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रा.डॉ. के.एन. सोनवणे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. दिलीप गिऱ्हे, प्राथमिक आरोग्य केंद्र, चहार्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. रक्षिता प्रसाद पाटील, सौ.संध्या संदेश जैन, कर्जाने गावाचे उपसरपंच प्रमोद भाया बारेला, ग्रामपंचायत सदस्य अनेरसिंग बारेला, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील, कर्जाने आश्रम शाळेचे प्राचार्य दिलीप सावकारे, मुख्याध्यापक रामचंद्र आखाडे  आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

   या कार्यक्रमाच्या सुरुवातीला  मान्यवरांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील व शिक्षण महर्षी कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील  यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. प्रमुख कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. के. लभाने यांनी केले. त्यात शिबिरादरम्यान केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी सादर केला. त्यात वनराई बंधाऱ्याची निर्मिती, गरजू मुलांना कडे वाटप, गावातील परिसराची केलेली साफसफाई, विविध जनजागृतीपर केलेले पथनाट्य, मतदार जनजागृती व त्या संदर्भात केलेले सर्वेक्षण यांचा समावेश होता.   याप्रसंगी भावेश वाघ व वैभव शिरसाठ या स्वयंसेवकांनी संपूर्ण हिवाळी शिबिराविषयीचे अनुभव कथन केले.

     'नॉट मी बट यु' या संकल्पनेनुसार स्वयंसेवक हिवाळी शिबिरात विविध उपक्रमात सहभाग घेत होते. तसेच 'सक्षम युवा समर्थ भारत' या थीम वर आधारित वकृत्व स्पर्धा व सामाजिक विषयावर नाटके, पथनाटकात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमातून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून भावेश वाघ, वैभव शिरसाठ व गौरव बाविस्कर या स्वयंसेवकांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मा. डॉ. दिलीप गिऱ्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्वयंसेवकांना सक्षम युवकाचे समर्थ भारत निर्मितीसाठी योगदान कसे महत्वाचे आहे याची जाणीव आपल्या मनोगतातून करून दिली.  

        याप्रसंगी उपसरपंच प्रमोद भाया बारेला यांनी आपल्या मनोगतातून  स्वयंसेवकांचे शिबिर दरम्यान गावांसाठी  केलेल्या कामासाठी  आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डी. एम. पाटील, आश्रम शाळेचे प्राचार्य दिलीप सावकारे, मुख्याध्यापक रामचंद्र आखाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

      समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षीय  मनोगत महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रा. डॉ. के. एन.सोनवणे यांनी केले. त्यात त्यांनी समाजातील उच्च पदावर पोहोचलेल्या अनेक व्यक्तींचे उदाहरण स्वयंसेवकांना देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बडगुजर  तर आभार क्रीडा संचालिका डॉ. सौ. क्रांती क्षिरसागर यांनी मानले. 

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मधुचंद्र भुसारे, भैय्यासाहेब देवरे , कल्पेश पाटील, गणेश कोळी, योगेश चित्रकथी, कुणाल रकमे व  भुवनेश्वरी शार्दुल यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने