स्व अस्तित्व ओळखून कोणत्याही समस्येला बिनधडक सामोरे जावे :डॉ.जयंत लेकुरवाळे

 स्व अस्तित्व ओळखून कोणत्याही समस्येला बिनधडक सामोरे जावे :डॉ.जयंत लेकुरवाळे


झटपट पोलखोल/ सतीश गायकवाड

मुक्ताईनगर प्रतिनिधी दि.१०फेब्रुवारी} कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि सद्गुरु शिक्षण शास्त्र  महाविद्यालय जळगाव विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान सहा दिवसीय कार्यशाळा दिनांक 05 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. आत्मनिर्भर युवती अभियानाची  अंमलबजावणी यशस्वीरित्या  सुरू आहे.आज कार्यशाळाच्या  सहाव्या दिवशी दिनांक 10 /02/2024 रोजी समारोप प्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग अधिकारी डॉ.जयंत लेकुरवाळे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थितीत होते.त्यांनी विद्यार्थ्यांना आपले स्व अस्तित्व ओळखा. कोणत्याही समस्येला बिनधडक सामोरे जावे.मेहनत करा, आदर्श नागरिक म्हणून समाजकार्य  करा. तुमचे पद तुमच्या कुटुंबा पेक्षा महत्त्वाचे नाही .आपल्या वागणूकीची  छाप इतरांवर पडेल असे कार्य करा असे मार्गदर्शन केले.तसेच आजच्या व्याख्यानाच्या प्रमुख वक्त्या Advt. सुवर्णा सुर्यवंशी एस एन डी टी,महाविद्यालय जळगाव यांनी विद्यार्थिनींना  महिला आणि कायदा व्यवस्था विषयावर मार्गदर्शन वेगवेगळया कलम सांगीतले.कोणत्या गुन्हास कोणती शिक्षा व किती दंड आकारला जातो ते समजावुन सांगितली. तसेच विद्यार्थिनीच्या शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयातील प्रभारी प्राचार्य डॉ अनिता वानखेडे या होत्या. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा पाटील विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.प्रास्तविक मध्ये मागील पाच दिवसाचा सारांश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सपना चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन उमेश धनगर यांनी मानले. सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील 50 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.अभियानासाठी सतत  प्रेरणा देणारे संस्थेचे संचालक डॉ. नारायण खडके आणि वर्षा खडके, महाविद्यालयातील डॉ अनिता वानखेडे ,डॉ प्रतिभा पाटील, डॉ जयश्री पाटील, प्रा सुवर्णा अहिरे, आणि  शिक्षकेतर कर्मचारी  अरविंद पवार, पंकज वाघ  चंद्रकांत सपकाळे प्रथम आणि द्वितीय वर्ष प्रवेशित विदयार्थी शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने