कर्जाणे येथे श्रमदानातून निर्माण केला बंधारा


 कर्जाणे येथे श्रमदानातून निर्माण केला बंधारा


चोपडा,दि.५(प्रतिनिधी):येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिर  दिनांक ३० जानेवारी ते ०५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत कर्जाणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे. 

या सात दिवसीय शिबीरादरम्यान विविध समाजोपयोगी  उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातील एका उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गाव कर्जाणे गावालगत एक बंधारा बांधण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी श्रमदानातून पाच ते सहा फूट खोल व  १० ते २० हजार लीटर पाणी साचेल असा बंधारा तयार केला. या बंधाऱ्याचा उपयोग गावातील पशू,पक्षी तसेच शेतीसाठी होईल. हा बंधारा बांधण्याकरिता कर्जाणे गावाचे उपसरपंच प्रमोद भाया बारेला याचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या शिबिराचे व  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. के. लभाणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. सौ. क्रांती क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या नियोजनासाठी व कृती कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने