अजून ही माणुसकी आहे शिल्लक चार महिन्यांच्या बाळाला दिले जीवदान

 अजून ही माणुसकी आहे शिल्लक चार महिन्यांच्या बाळाला दिले जीवदान


गलंगी तालुका चोपडा (मच्छिंद्र रायसिंग ): मेलाणे ता चोपडा जिल्हा जळगांव आदिवासी क्षेत्रातील बाहुल असून संदीप बटान पावरा यांच्या चार महिन्या असलेला बाळ हृदयाला मोठा छेद असून खाजगी रुग्णालया दाखवत पैशांची मोठ्या प्रमाणावर दहा लाख खर्च  सांगत असून त्यांच्यासमोर संकटाचे मोठे डोंगर उभे राहिले. तसेच उपसरपंच कर्जाणे व आदिवासी सामाजिक कार्यकर्ता श्री प्रमोद बारेला यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी डॉ श्री किरण पाटील डॉक्टर श्री सुरेश पाटील वैद्यकीय अधिकारी उपरुग्ण चोपडा यांना मोफत उपचाराचा योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य आणि तात्काळ देऊन ठाणे (मुंबई) येथील जुपीटर हॉस्पिटल एका खाजगी रुग्णालयात आदित्य संदीप बारेला या चार महिन्याचे बाळला दहा लाख खर्च येणारा हा  (MJPJY) योजनेअंतर्गत एका दिवसात रेशन कार्ड बनवून मोफत मध्ये शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी करून सुखरूप घरी पोहोचण्यात आले .प्रमोद बारेला हे सर्व आदिवासी बांधवांना आव्हान करत आहे की, समाजामध्ये असे आजार असल्यास संपर्क  त्यांनी संपर्क करावा आणि त्यांना रेशन कार्ड वरती मोफत मध्ये उपचार खाजगी रुग्णालयात करण्यास मदत मिळेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने