राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऋषिकेश बोरसे

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी ऋषिकेश बोरसे


अमळनेर,दि.५(प्रतिनिधी  दीपक प्रजापती): सोनखेडी ता.अमळनेर येथील ऋषिकेश संजय बोरसे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली रा.वि.कॉं चे प्रदेशध्यक्ष मा.सुनीलजी गव्हाणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 

ऋषिकेश बोरसे हे सामाजिक कार्यासाठी तत्पर असून विध्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव संघर्ष करून विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्याकामी सदैव कटिबद्ध असल्याची भावना गव्हाणे यांनी व्यक्त केली. गेल्या एक,दीड वर्षांपासून निष्ठने,निस्वार्थीपणाने केलेल्या कामाची व सामान्य कार्यकर्त्यांची दखल नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतो, असे ऋषिकेश बोरसे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय प्रदेशध्यक्ष उमेश पाटील, ग्रंथालय प्रदेश संयोजक रिता बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, युवक तालुकाध्यक्ष सचिन वाघ,विध्यार्थी प्रदेश सचिव वेदांशु पाटील,विद्यार्थी तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, विद्यार्थी शहरध्यक्ष सनी गायकवाड, तेजस जाधव, कुलदीप पाटील,प्रणव पाटील,समीर शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले.!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने