आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते ११ दिवसात ३११ कामांचा श्रीगणेशा १२५कोटींचे विकास पर्वास प्रारंभ..

 आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते ११ दिवसात ३११ कामांचा श्रीगणेशा १२५कोटींचे विकास पर्वास प्रारंभ.. 

♦️उत्कृष्ट कामांसाठी प्रत्यक्ष नागरिकांनी लक्ष घालावे उभयतांचे आवाहन

चोपडा,दि.15(प्रतिनिधी)तालुक्यात   चालू 15 फेब्रुवारी ते 26फेब्रुवारी  दरम्यान   311 कामांचा शुभारंभ तालुक्याचे कणखर  नेतृत्व असलेल्या  दमदार आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या  शुभहस्ते होत असून जवळपास  100/125 कोटींच्या विकास पर्वाचा नारळ फुटत आहे  . एकाच वेळी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर या कामांचा  श्रीगणेशा होत असल्याने एकटे आमदार या सर्व कामांकडे बघू शकणार नसल्याने  या कामांचे मालक  स्वतः नागरिकच आहेत  त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या भागातील कामांकडे लक्ष घालून ते उत्कृष्ट कसे होईल याकडे लक्ष घालून काम करून घ्यावे आणि जिथे बोगस काम होत असेल  त्यांनी मला कळवावे मी  प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सत्यता पडताळून बघेल व काम  बोगस होत असल्याचे निदर्शनास आल्यास  ते काम ताबडतोब बंद पाडू असा कडक इशारा माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी दिला आहे.ते  विविध गावांमध्ये विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

 या कामांमध्ये रस्ता मजबूतीकरण, रस्ता डांबरीकरण, शाळा खोली बांधकाम, व्यायाम शाळा बांधकाम, संरक्षण भिंत बांधकाम, साठवण बंधारे,बंधारे खोलीकरण  , अंगणवाडी बांधकाम, पेव्हर ब्लॉक, बौद्ध विहार बांधकाम, भक्त निवास, सिमेंट बंधारे बांधकाम  अशा विविध विकास कामांचा समावेश आहेअशी माहिती प्रा. सोनवणे यांनी यावेळी दिली 

याप्रसंगी यावल तालुक्याचे शिवसेना नेता सुर्यभान पाटील,  कृउबा सभापती नरेंद्र पाटील ,संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, तसेच राजेद्र पाटील, कैलास बाविस्कर ,हाजी साहेब  , मोहरद माणिक बापु मोहरद संरपच, संजय शिरसाठ ,कीशोर पाटील, प्रवीण कोळी ,पंचक लिलाधर पाटील, भुषण पाटील ,नामदेव पाटील वडगाव ,अन्नु ठाकुर ,मंगल इंगळे ,संजय इंगळे ,प्रमोद  बाविस्कर ,चंद्रशेखर साळुके, दिधा पावरा ,अशपाक दादा या मान्यवरांसह तालुक्यातील विविध शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकारी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने