खडसे महाविद्यालयाचे एनएसएस विशेष हिवाळी शिबिर हरताळे येथे उत्साहात संपन्न

 खडसे महाविद्यालयाचे एनएसएस विशेष हिवाळी शिबिर  हरताळे येथे उत्साहात संपन्न


झटपट पोलखोल

मुक्ताईनगर प्रतिनिधी/ सतीश गायकवाड दि.१४} श्रीमती  जी.जी.खडसे महाविद्यालयातील  एनएसएसचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक गाव हरताळे तालुका मुक्ताईनगर येथे  *दिनांक 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी,2024  या कालावधीत जि. प. प्राथमिक शाळा, हरताळे  येथे उत्साहात संपन्न झाले.

या विशेष हिवाळी शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक प्रमोद पाटील - माजी सैनिक हरताळे उपस्थित होते तर महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन अध्यक्षस्थानी होते. या उद्घाटन कार्यक्रमाला मान्यवरांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, हरताळे गावचे पोलीस पाटील प्रदीप काळे, हरताळे गावचे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त प्राध्यापक सिताराम चौरे, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गणेश चव्हाण, एनएसएस सहाय्यक  कार्यक्रम अधिकारी डॉ दीपक बावस्कर,  विद्यार्थी विकास अधिकारी  प्रा. डॉ. संजीव साळवे व प्रतिभा ढाके यांची विशेष उपस्थिती होती.

माजी सैनिक प्रमोद पाटील यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना प्रत्येक युवकाने समाजसेवे सोबत राष्ट्रसेवा जोपासून कुटुंब, समाज व राष्ट्रनिर्मित सहभाग नोंदवून उल्लेखनीय कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त प्राध्यापक सिताराम चौरे यांनी हरताळा गावाची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय मनोगतात  प्राचार्य महाजन यांनी एनएसएसचे विशेष शेवाळी शिबिर हे विद्यार्थ्यांना स्वयंसेवक बनवण्यासाठी प्रेरित करणारे आहे,त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिबिरार्थी बनून जीवनात शिस्त बाळगून यशस्वी व्हावे अशा मापक शुभेच्छा दिल्या.  स्वयंसेवकाचे विविध गट करून त्यास स्टार खेळाडूंची नावे देण्यात आली. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.ताहीरा मीर, प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे यांनी तर आभार प्रदर्शन कु. वैष्णवी नेमाडे हिने केले. 

   *शिबिराच्या दुसऱ्या दिवशी* सकाळच्या सत्रात शाळेच्या परिसरातील स्वच्छता केली. तसेच शाळेच्या परिसरात एनएसएस विभागाने तीन वर्षापासून लावलेल्या झाडांची निगा करून पाणी दिले. दुपारच्या सत्रात वनस्पतीशास्त्र विभाग   प्रमुख प्रा.एस.ए. देशमुख व प्रा. डॉ. अतुल वाकोडे यांनी 'बेस्ट फ्रॉम वेस्ट'या विषयावर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच खर्चे हॉस्पिटल,मुक्ताईनगर येथील डॉ. मयुरी खर्चे यांनी 'आरोग्यम् धनसंपदा' या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना चिंतन करायला लावले. जळगाव जिल्हा आरटीओ ऑफिसर श्याम लोही यांनी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत शिबिर स्थळी भेट देऊन स्वयंसेवकाशी विविध प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधत बारा स्वयंसेवकांना बक्षीसरूपी हेल्मेट दिले. 

    *शिबिराच्या तिसऱ्या दिवशी* सकाळच्या सत्रात तहसील कार्यालय, मुक्ताईनगर  यांच्या सहकार्याने हरताळे गावात ईव्हीएम मतदान यंत्राच्या प्रात्यक्षिकासह मतदार जनजागृती अभियान रॅली यशस्वीपणे काढली. दुपारच्या सत्रात वित्त सल्लागार कुणाल महाजन यांनी 'वित्तीय साक्षरता' या विषयावर पीपीटी द्वारे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून कार्यप्रवण केले. 

*शिबिराच्या चौथ्या दिवशी* सकाळच्या पूर्वसत्रात महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.प्रतिभा ढाके यांनी योगा व झुमा डान्स स्वयंसेवकांचा घेऊन मनोरंजनात्मक कवायत घेतली. सकाळच्या सत्रात 'बेटी पढाव- बेटी बचाव' चा नारा देत हरताळा गावातून रॅली काढून तलावाच्या काठी वसलेल्या साई मंदिराला भेट देऊन स्वच्छता अभियान राबवले. दुपारच्या सत्रात पायाला फुगे बांधून फोडण्याचा मनोरंजनचा आनंदमय कार्यक्रम संपन्न करण्यात आला. तसेच पाचपांडे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, मुक्ताईनगर यांच्या वतीने 'आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण' विद्यार्थ्यांना देऊन जीवनदाता बनण्यास प्रोत्साहित केले. त्याचबरोबर प्राचार्य पंकज घटे यांनी 'कृषी व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करून साधन संपत्ती वाचवण्याचे आवाहन केले. याच दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे एनएसएसचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ, दिनेश पाटील, विभागीय समन्वयक डॉ. जयंत नेहते, आवटी नाना आणि आकाश भामरे यांनी शिबिर स्थळी भेट देऊन स्वयंसेवकाचे मनोबल वाढवले, तसेच डॉ. नांद्रे यांनी खडसे महाविद्यालयातील एनएसएसचा स्वयंसेवक प्रफुल यमनेरे एनआरडी परेड करिता नवी दिल्ली येथे सहभागी झाल्याबद्दल जाहीर अभिनंदन सुद्धा केले. 

*शिबिराच्या पाचव्या दिवशी* सकाळच्या सत्रात 'पर्यावरण वाचवा -जीवन वाचवा' या घोषणेचा नारा देत हरताळा वनउद्यानास क्षेत्रभेट दिली. वनउद्यानात भूगोल विभागातील प्रा. राजन खेडकर यांनी 'आपली वसुंधरा अभियान' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत 'वसुंधरा वाचवा- आयुष्य वाचवा' हा संदेश दिला. दुपारच्या सत्रात प्रा. एस. एन  पाटील यांनी आपली वसुंधरा अभियाना अंतर्गत 'वसुदैव कुटुंबकम' ही संकल्पना शाश्वत करण्याचे आवाहन केले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार रवींद्र तायडे यांनी स्वसंरक्षण व आत्मनिर्भर या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी डोळस व जागरूक राहावे हा संदेश दिला. 

*शिबिराच्या सहाव्या दिवशी*  सकाळच्या सत्रात हरताळा गावातील विविध समस्येचे सर्वेक्षण व निरीक्षण करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ.संतोष थोरात  व प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांनी गावकऱ्यांची व शिबिरार्थींची रक्तगट तपासणी केली, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील एचआयव्ही लॅब टेक्निशियन नीरज खाचणे यांनी एचआयव्ही चाचणी शिबिर संपन्न केले. 

*समारोप समारंभ*

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री राणे  गुरूजी, आरोग्य सेवक प्रदीप काळे, मंडप कॉन्ट्रॅक्टर कैलास सपकाळ आणि माऊली अक्वा सेंटरचे संचालक कुंभार हे मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे शिवाजीराव पाटील यांनी खडसे महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांनी हरताळा गावात सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय जनजागृती केल्याबद्दल आभार मानले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य अनिल पाटील यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गाव एक सुजलाम सुफलाम गाव असून एनएसएस शिबिर घेण्याची खडसे महाविद्यालयाला संधी मिळाली त्याबद्दल तमाम गावकऱ्यांचे आणि जि. प. प्राथमिक मराठी शाळाचे आभार मानले. तसेच स्वयंसेवकांनी शिबिराच्या दरम्यान राबवलेल्या कार्याबद्दल गौरवउद्गार काढून शुभेच्छा दिल्या. मंगेश  बराटे व सलोनी भोई यांनी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरातील अनुभव कथन केले.  तसेच प्रणव पवार, हरीओम इंगळे, वैष्णवी नेमाडे, महेश भोईटे, शुभम शेळके, वैभव झोपे, प्रशिक बोदडे व सारंग पाटील इत्यादी स्वयंसेवकांनी विशेष हिवाळी शिबिराचे अनुभव कथन केले. फोटोग्राफीचे कार्य चंदन शिमरे यांनी तर कुंदन जंगले, कांतीलाल वसावे,पवन सुतार, यश महाजन, कृष्णकांत भारुडकर, भाग्यश्री भोळे व भाग्यश्री बोरोले या व इतर अनेक  स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले. एनएसएस विशेष हिवाळी शिबिरासाठी जि. प. प्राथमिक मराठी शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, साई मंदिर प्रतिष्ठान, वनउद्यान समिती, हरताळे गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे विशेष सहकार्य लाभले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी धनश्री नारखेडे तर प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक बावस्कर यांनी आणि आभार प्रदर्शन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक विजय डांगे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने