संत श्री जय सेवालालजी महाराज जयंती उत्साहात साजरी

 संत श्री जय सेवालालजी महाराज जयंती उत्साहात साजरी


चोपडा दि.17(प्रतिनिधी)-चोसाका येथील ऊसतोड कामगारांच्या गोर बंजारा संत श्री जय सेवालाल जी महाराज मित्र मंडळाने मोठ्या उत्साहात संत श्री सेवालाल जी महाराज जयंती साजरी केली. संत श्री जय सेवालाल जी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली.  आबाल वृद्ध, महिला पुरुष  या सर्वांनी मिरवणुकीत सहभाग घेतला व आनंदाने नाचत गाजत शोभायात्रा काढली. यावेळी संत श्री जय सेवालाल जी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

मंडळातर्फे चोसाकाचे कृषी अधिकारी देसले बापू ,श्रीराम पाटील, चोपडा सूतगिरणीचे  संचालक के डी चौधरी, संतोष  पवार मुकादम ,जगदीश बाबूलाल पवार, भूषण आप्पा पाटील, देवकांत के चौधरी या मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले  उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचा कार्यकर्त्यांनी भावपूर्ण सत्कार केला. सत्कार करण्यात आला. शोभायात्रेत कलशधारी महिला यांचे आकर्षण होते. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सेवालाल महाराजांचा जयजयकार करत कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने