केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी धोरणाविरुद्ध देशव्यापी भारत बंद आंदोलनाला पाठिंबा

 केंद्र सरकारच्या कामगार शेतकरी धोरणाविरुद्ध देशव्यापी भारत बंद आंदोलनाला पाठिंबा

 जळगावदि.१७(प्रतिनिधी) केंद्र सरकार कामगार कष्टकरी शेतकरी अंगणवाडी आशा असंघटित कामगार  ग्रामपंचायत  कर्मचारी  आदींच्या  मागण्यांसाठी चाललेल्या आंदोलना कडे दुर्लक्ष करून भांडवलदार उद्योगपती धारजीने धोरण राबवत आहे देशात संविधानाच्या तरतुदींच्या विचार न करता लोकशाही विरोधी घटना घडवत आहे सरकारी विरुद्ध आवाज उचलणाऱ्या वृत्तपत्रे पत्रकार किसान यांची गडजेपी होत आहे म्हणून केंद्र सरकारच्या अशा नितीविरुद्ध देशव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे .

सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान पेन्शन दहा हजार रुपये जुनी पेन्शन लागू करा कामगार संहिता मागे घ्या ,शेतकऱ्यांना शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे भाव मिळावा आदी मागण्यासाठी हा बंद पुकारलेला असून शेतकऱ्यांच्या दिल्ली येथे चाललेला आंदोलनात केंद्र सरकारने त्यांच्या मागणी मान्य कराव्यात तरच बंद मागे घेण्यात असे संघटनेने म्हटले आहे.

  अखिल भारतीय कामगार संघटना कृती समितीने देशव्यापी ग्रामीण भारत बंद आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्यात आयटॅक सिटी हिंद मजूर सभा इंटक व सर्व कामगार संघटना सामील आहेत जळगाव जिल्हा आयटीआय प्रणित अंगणवाडी आशा ग्रामपंचायत कंत्राटी कर्मचारी कंत्राटी नर्सेस कर्मचारी युनियन तसेच बचत गट संघटना शेतमजूर किसान सभा यांनी पाठिंबा दिलेला असून ते काम बंद ठेवून पाठिंबा देणार आहे अशी माहिती जळगाव जिल्हा आयटक चे अध्यक्ष कॉ अमृत महाजन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र खरे, किशोर कंडारी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे प्रेम लता पाटील ममता महाजन पुष्पावती मोरे भाग्यश्री   लद्दे सीमा बागड वत्सला पाटील संघटनेच्या श्रीमती सुलोचना साबळे मीनाक्षी सोनवणे सुनिता ठाकरे जिजाबाई राणे शेतमजूर युनियनचे कॉम्रेड लक्ष्मण शिंदे भास्कर सपकाळे प्रेमसिंग बारेला वासुदेव कोळी किसान सभेचे गंभीर महाजन ज्ञानेश्वर पाटील चंद्रकांत महाजन कंत्राटी दर्शन पूनम चौधरी भारती पाटील ज्योती पाटील मोहिनी धांडे जागृती राजपूत आदींनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने