चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही जिल्हाध्यक्षाची हजेरी

चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही  जिल्हाध्यक्षाची हजेरी


चोपडा,दि.२०(प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाची बैठक मोठ्या उत्साहात चोपडा येथे श्री समर्थ पॅलेस येथे पार पडली. विजय उर्फ बाळासाहेब पाटील तालुकाध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच बैठक घेण्यात आली असून सदर बैठकीला राष्ट्रवादीचे दोघी जिल्हाध्यक्ष म्हणजेच उमेश दादा नेमाडे व युवक चे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

     सदर बैठकीत लोकसभा,विधानसभा व विविध स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ह्या एकत्र लढविण्यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार पुढील सर्व घडामोडी होतील असा संदेश जिल्हाध्यक्ष उमेश दादा नेमाडे यांनी दिला,व अरुंणभाई गुजराथी व कोणीही नेते असो त्यांच्यावर भाष्य न करता आपण आपला पक्ष कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

   जेष्ठ नेते घनश्यामभाई अग्रवाल यांनी ही जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हाथ बळकट करण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी आपण सर्व एकत्रित येऊन काम करूया,मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचेच काम करेल असे सांगितले.

    कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती नारायणदादा पाटील,माजी झेड पी सदस्य सुनीलआबा पाटील,उपजिल्हाध्यक्ष व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव,तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,युवकचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांनी ही मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.व्यासपीठावर प्रविणभाई गुजराथी मा.व्हा.चेअरमन चोपडा पीपल्स बँक,गरीष देशमुख शहर अध्यक्ष,नौमान काझी,आसिफ सैयद,निलेश पाटील मा.संचालक चोसाखा,व पदाधिकारी उपस्थित होते.

वलंय सुनील पाटील सोशल मीडिया जिल्हा ध्यक्ष यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आलेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केले,तर प्रास्ताविक नारायण दादा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पी.के.न्ह्यायदे सर सरपंच वर्डी यांनी केले.

       यावेळी महिला पदाधिकारी चंद्रकला ताई दत्तात्रय पाटील सरपंच चहार्डी, सोनाली ताई नारायण पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालीका,विनयाताई बाळासाहेब पाटील संचालीका चोसाखा,बबिता धनगर मा, सरपंच वर्डी,सविता पाटील,महिला पदाधिकारी हजर होत्या.

सचिन धनगर व्हा.चेअरमन शेतकी संघ,संजय पाटील,रविंद्र पाटील,गोरख पाटील,सुभाष पाटील,वाल्मीक पाटील,न्यानेश्वर पाटील,प्रदीप शिंदे, रमाकांत बोरसे,प्रवीण पाटील,

सनी सचदेव,किरण मोरे,चेतन पाटील,अरुण धनगर,परेश देशमुख,शुभम सोनवणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने