पोलीस कर्मचारी तोतया अन्न औषध प्रशासन अधिकारी बनून ५ लाखाच्या खंडणी उकळतांना पोलीस तावडीत..दोघांना अटक १ पसार

 पोलीस कर्मचारी तोतया अन्न औषध प्रशासन अधिकारी बनून ५ लाखाच्या खंडणी उकळतांना पोलीस तावडीत..दोघांना अटक १ पसार

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहरात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून पाच लाखांची खंडणी उकळू पाहणाऱ्या तोतया अधिकाऱ्याना शहर पोलिसांनी शिताफीने अटक करून जेलची हवा दाखविली आहे तर अन्य एक पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याच्या मागावर असल्याने कोणत्याही क्षणी पोलिस जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

 याबाबत प्राप्त माहिती अशी की,अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शहरातील अवैध गुटखा विक्रेत्याकडून औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन (वय 28 रा. लोहिया नगर चोपडा) यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपडा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा आरोपी फरार झाला असून तिघांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेले केलेल्या दोन आरोपींमध्ये एक आरोपी हा पोलीस कर्मचारी असून यापूर्वीही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळते.

चोपडा शहरात जयहिंद कॉलनी परिसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले. याची माहिती मिळताच अमृतराज सचदेव यांनी तात्काळ चोपडा शहराचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांना सदरची बाब कळविली व घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांचे पथक गेले असता त्यांना संशयित आरोपी संशयितरित्या तोतयारी करताना आढळले.

फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन व त्यांच्यासोबत असलेले सचिन अरुण पाटील यास तिघां संशयितांनी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवले. तसेच सोलापूर विभागात पोलीस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते (वय 35 रा. साकटी रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर), विनायक सुरेश चवरे (वय 35 राहणार 721 गोविंदपुरा सोलापूर रोड गुर्जर वाडा जिल्हा सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाख रुपये खंडणी मागितली.

आम्ही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आहोत असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम 170, 384, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटना घटनास्थळी भेट दिली असून संशयित आरोपींच्या ताब्यातील चारचाकी वाहन देखील जप्त केले आहे. दरम्यान, सदर वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली असून खंडणी कामी वापरले असल्याचेही कळते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने