जळगावात रामभक्त डॉ . अश्विन सोनवणे यांच्या पुढाकाराने ३ हजार किलो बुंदीच्या महाप्रसाद वाटपाचे काम युध्दपातळीवर ..५० हजार घरापर्यंत पोहचण्याचा संकल्प

 

जळगावात रामभक्त डॉ . अश्विन सोनवणे यांच्या  पुढाकाराने ३ हजार किलो  बुंदीच्या महाप्रसाद वाटपाचे काम युध्दपातळीवर ..५० हजार घरापर्यंत पोहचण्याचा संकल्प               

जळगाव दि.२०( प्रतिनिधी)22 जानेवारीला आयोध्या येथे प्रभू  रामचंद्रांचा  सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संपूर्ण देशात राम लल्लांचा जय घोष निनादणार असल्याचे औचित्य साधत  रामभक्त माजी उपमहापौर डॉ.आश्विनभाऊ सोनवणे  व सहकारी रामभक्तांनी  जवळपास  ४०ते ५० हजार घरापर्यंत ३हजार किलो वजनाचे बुंदीचे पाकिटांमधून  महाप्रसाद वाटप केला जात.  जिल्ह्यात  प्रथमच  एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद वाटप होत असल्याने राम नामाचा गजर होणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून बुंदी तयार करण्यासाठी हलवाई बंधू जोमाने कामाला लागले असून महिला वर्ग मोठ्या संख्येने महाप्रसादाचे पाकिटे बंदीस्त करण्यात तल्लीन आहेत. जळगाव शहरात ५०हजार घरापर्यंत हा महाप्रसाद पोहचण्याचा संकल्प रामभक्तांचा  असल्याचे  डॉ.अश्विन सोनवणे यांनी म्हटले आहे.       अयोध्येत  श्रीराम  उत्सव  साजरा होत असल्याने  देशभरात  रामभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून  ठिकठिकाणी भगवे झेंडे , मिरवणूक ,पालखी सोहळा , रामचरित मानस, हनुमान चालीसा पठण, महाप्रसाद वाटप,दीप प्रज्वलन, भजन, कीर्तन व धार्मिक असे  विविध कार्यक्रम होत असल्याने जळगावात हा आगळावेगळा उपक्रम सुरू असल्याने राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने