रामलल्लांच्या आयोध्येत प्रतिष्ठापनेनिमित्ताने चोपड्यात २२ रोजी रामरक्षा व हनुमान चालिसा पठण,विविध स्पर्धा

 रामलल्लांच्या आयोध्येत प्रतिष्ठापनेनिमित्ताने चोपड्यात २२ रोजी रामरक्षा व हनुमान चालिसा पठण,विविध स्पर्धा

चोपडा,दि.१७(प्रतिनिधी) - आयोध्येत दि.२२ रोजी हिंदू समाजाचे आराध्य दैवत श्रीरामाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर प्रतिष्ठापना होणा-या मंदिराच्या समारोहानिमित्ताने चोपड्यातील रामलल्ला विराजमान समितीच्या वतीने दि.२१ रोजी रांगोळी व गुढी उभारण स्पर्धा होणार आहे.तसेच दि.२२ रोजी सकाळी ७ वाजता रामरक्षा स्तोस्त्र व हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.समितीतर्फे वैद्य शैलेंद्रसिंह महाले,चंद्रशेखर पाटील व पूनम गुजराथी यांनी माहिती दिली.

यावेळी सांगण्यात आले की,संत श्री योगी दत्तनाथ गुरु गोरक्षनाथ यांचे सोबत रामरक्षा व हनुमान चालिसा पठण होणार आहे.यावेळी सुमारे पाच हजार भाविक उपस्थित राहतील.त्यांना या स्तोत्रांचे छापील साहित्य देखील देण्यात येणार आहे.याप्रसंगी महिलांची मोठी उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले.त्यादृष्टीने प्रयत्नही जारी आहेत.सर्व हिंदू भगिनींनी रामलल्लांच्या आयोध्येतील आगमनानिमित्ताने मोबाईलच्या स्टेटसला श्रीराम आगमन उत्सवाचे स्टेटस ठेवण्याचे आवाहन पूनम गुजराथी यांनी केले.

रामरक्षा गर्भसंस्कारांसाठी उपयुक्त

रामरक्षा स्तोत्राचा गर्भसंस्कारात सकारात्मक उपयोग होतो.तर रामरक्षा उच्चारणाने लहान मुलांचे बाल स्वरांमध्ये सुस्पष्टता येते असे वैद्य डॅा.प्राजक्ता महाले यांनी सांगितले.

यावेळी समितीचे उद्योजक विश्वनाथ अग्रवाल,निता अग्रवाल,डॅा.कांचन टिल्लू,गोपाल पाटील,अजय पालिवाल,भूषण देवळे,मनोज बागूल हे सदस्यही उपस्थित होते.आभार सागर नेवे यांनी मानले.चोपडा शहरातील जुन्या शिरपूर रस्त्त्यावरील विश्वनाथ जिनिंगच्या आवारात होणा-या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने